file photo  
मराठवाडा

‘सीएचबी’ प्राध्यापक आठ महिण्यापासून त्रस्त 

शिवचरण वावळे

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात अनुदानित तासिका तत्वावर काम करीत असलेल्या प्राध्यापकांना शासनाची सेवार्थ प्रणाली ‘एचटीई’ नुसार दर महिन्याला वेतन अदा करावे, असा शासन निर्णय असताना महाविद्यालयाच्या उदासीन धोरणामुळे सेवार्थ प्रणालीचा लाभ मिळत नाही. नांदेडच्या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने याबाबत वेळोवेळी प्राध्यापकांची सेवार्थ प्रणाली संदर्भात माहिती द्यावी, असे पत्र देऊनही महाविद्यालय प्रशासन मात्र टाळाटाळ करीत आहे.

आठ महिने झाले तरी मानधन मिळेना 
राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ता. १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये  शासन निर्णय घेऊन त्यात विविध अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्वावर सेवा करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ केली. त्याचबरोबर प्राध्यापकांचे मानधन सेवार्थ प्रणालीनुसार दरमहा देण्यात यावे, असा निर्णय झाला होता.
अनेक महाविद्यालयात नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे. ही भरती जून, जुलै महिन्यात करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया होऊन जवळपास आठ महिन्याच्या कालावधी लोटला तरी, अद्यापही तासिका तत्त्वावरील नियुक्त करण्यात आलेल्या प्राध्यापकांना मानधन मिळाले नाही. 

सहसंचालकांच्या आदेशाला केराची टोपली
राज्याच्या उच्च शिक्षण तंत्र विभागाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना दरमहा सेवार्थ प्रणालीनुसार मानधन द्यावे, असा शासन निर्णय ता. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी निर्गमित केला होता. वर्षभरापासून या प्राध्यापकांना सेवार्थ प्रणालीनुसार वेतन मिळाले नाही. नांदेड येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने ता. दहा जानेवारी २०२० रोजी प्राचार्यांना परिपत्रक काढून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना एचटीई सेवार्थ प्रणालीनुसार मानधन अदा करायचे असून त्यात महाविद्यालयाचे नाव, पत्ता, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची संख्या, नियुक्त प्राध्यापकांची नावे, नियुक्तीची तारीख, नियुक्तीचा कालावधी, विषय, विद्यापीठ मान्यता पत्र, देण्यात आलेला कार्यभार अशी माहिती विवरणपत्रामध्ये द्यायची होती. सोबत ‘ब’ विवरणपत्र मध्ये सेवार्थ प्रणालीची माहिती मागवली होती. महाविद्यालय प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करीत उच्च शिक्षण सहसंचालकच्या पत्रकाला केराची टोपली दाखवत आहे. 

विद्यापीठाच्या सिनेटमध्ये चर्चा करणार
अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना दरमहा सेवार्थ प्रणालीनुसार मानधन देने बंधनकारक असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या बाबत विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत हा विषयावर चर्चा करणार आहे.
- डॉ. बालाजी वैजापुरे, सिनेट सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi and Emmanuel Macron: भारताचा दबदबा जागतिक पातळीवर कायम! आता मोदींची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशीही चर्चा

भक्ती, उत्साह आणि विरहाचा संगम! मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पुणेकरांच्या डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘गणपती बाप्पा मोरया’

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पावसाच्या सरी असूनही मुंबईत लाखो लोक विसर्जन मिरवणुकीत सामील

Ganesh Festival 2025 : केज पोलिसांची डीजे विरोधात कारवाई; गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा आग्रह

"आठ महिने तिने आम्हाला भेटणं टाळलं" प्रिया मराठेच्या अखेरच्या दिवसांबद्दल मैत्रीण झाली व्यक्त; म्हणाली..

SCROLL FOR NEXT