Chh. Sambhajinagar  
मराठवाडा

Chh. Sambhajinagar : कचरा डेपोला वारंवार आग! महापालिकेला दरमहा दहा लाख रुपये दंडाची शिफारस

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचरा डेपोला वारंवार लागत असलेल्या आगीच्या घटनांची दखल घेत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने नेमलेल्या संयुक्त समितीने महापालिकेला दरमहा १० लाख दंड आकारण्याची शिफारस केली आहे. या समितीने न्यायाधिकरणाला अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता. सात) सुनावणी झाली. याचिकाकर्त्याचे वकील उपस्थित नसल्याने पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.

महापालिकेच्या हद्दीत कचरा जाळण्याच्या घटना घडत आहेत. या प्रकारात पर्यावरणाची हानी झाल्याने पर्यावरण विभागाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करीत सूरज प्रदीपकुमार अजमेरा यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली आहे.

दोन वर्षांत चिकलठाणा कचरा प्रक्रिया केंद्रात २१२ आणि पडेगाव केंद्रात १२९ वेळेस कचऱ्याच्या ढिगाला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची जबाबदारी कुणी घेत नसल्याने अजमेरा यांनी याचिकेत पर्यावरणाच्या हानीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आगीमुळे पर्यावरणाची हानी आणि नागरिकांना धोका निर्माण झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर न्या. दिनेशकुमार सिंग आणि न्यायिक सदस्य विजय कुलकर्णी यांनी संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतीक भरणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुशीलकुमार राठोड आणि मनपाचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांच्या संयुक्त समितीने घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन ‘एनजीटी’त अहवाल सादर केला. महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचे नियम पाळले नाहीत. ‘पर्यावरण कायदा २०१६’ च्या नियमांची महापालिकेने अंमलबजावणी केली नाही आणि उपाययोजनांबाबत वेळेची मर्यादा पाळली नाही. आतापर्यंत मनपाने पर्यावरण हानीपोटी दंडही दिलेला नाही.

त्यामुळे मनपाला दरमहा दहा लाख रुपये दंड आकारण्याची शिफारस समितीने केली आहे. हा दंड एक एप्रिल २०२० ते काम पूर्ण होईपर्यंत द्यावा, असे अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे दहा दिवसात दंड जमा करायचा आहे. पर्यावरण संवर्धन कायद्यानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, असेही समितीने नमूद केले आहे. महापालिकेतर्फे ॲड. अनिरुद्ध कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ॲड. जाधव यांनी बाजू मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT