Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: "झटकन हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही कारण..", मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली जरांगे पाटलांच्या प्रकृतीची काळजी

थोडा वेळ सरकारला द्यावा. जरांगे पाटील यांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला आहे. या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. कुठल्याही परिस्थितीत कुणाला फसवणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत दिलं आहे. तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे म्हणालेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. जरांगे पाटील यांनी स्वत:च्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत, पाणी घेतलं पाहिजे, आम्हालाही त्यांची काळजी आहे, त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. झटकन हा निर्णय सरकार घेऊ शकत नाही. कारण ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत मिळावं ही आमची भावना आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

त्यांनी जो मराठा समाजासाठी लढा सुरू केला आहे, त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर आहे. म्हणून आज आम्ही बैठक बोलावली आहे, मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे, टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. सरकारने जबाबदारी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याशी उद्या आमचे प्रतिनिधी, आपली उपसमिती, सरकारचे अधिकारी चर्चा करतील. त्यांनाही विनंती कमिशनर, जिल्हाधिकारी करतील. ५८ मोर्चे शांततेच निघाले होते, कुठेही गालबोट लागले नाही. त्यामुळे लाखोंचे मोर्चे निघूनही कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. धोक्यात आली नाही. मराठा समाजाने अगदी सजग होऊन पाहिले पाहिजे. गालबोट लागल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.'

'मराठा समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या मुला-बाळांचा, आई-वडिलांचा विचार करावा. त्यांना भावनिक आवाहन करू इच्छितो की, राज्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखणं ही सरकारची जशी जबाबदारी आहे तशीच नागरिकांची देखील जबाबदारी आहे. मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील ही जबाबदारी घेतली पाहिजेत. जरांगे पाटील यांनी पाणी आणि अन्न घ्यावे. तसंच, सरकारला थोडा अवधी द्यावा.', असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर अपघात, फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर

Marathi News Live Updates : उद्यापासून दोन दिवस नाशिकला ‘येलो अलर्ट’

Tax Amendment Bill 2026: UPI, NEFT आणि RTGS सह डिजिटल पेमेंट्समध्ये काय बदल होणार? पाहा 10 मोठे अपडेट्स एका क्लिकमध्ये

IND vs SL Warm UP Match: केएल राहुल करतोय टीम इंडियाचे नेतृत्व, मग शुभमन गिलला नेमकं काय झालं? BCCI ने दिली माहिती

BJP Leader Arrest : माजी खासदार डॉ. हिना गावितांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवलं! भाजप नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, मुलगा अन् PA सह चौधरी जाळ्यात

SCROLL FOR NEXT