images 
मराठवाडा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्याचा उस्मानाबाद दौरा रद्द, बुधवारी अतिवृष्टीग्रस्त भागाची करणार पाहणी

तानाजी जाधवर

उस्मानाबाद  : अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी (ता.२०) उस्मानाबादच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र सदरील दौरा रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी बुधवारी (ता.२१) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार असुन प्रत्यक्ष शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीनेने काटगावकडे (ता. तुळजापूर) प्रयाण, सकाळी सव्वा दहा वाजता काटगाव येथे आगमन होणार आहे. तेथील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन सव्वा दहा वाजता काटगाव येथून तुळजापूरमार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण, तर सव्वा अकरा वाजता अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात येईल.

साडेअकराच्या जवळपास अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. शासकीय विश्रामगृह येथे दुपारी साडेबारा वाजता पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा व अभ्यागतांच्या भेटी घेण्यात येणार आहे. दुपारी एक ते पावणेदोन वाजेपर्यंत मुख्यमंत्री यांनी वेळ राखीव ठेवली आहे. पावणदोन वाजता शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होणार असून साडेतीन वाजता सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

SCROLL FOR NEXT