410Uddhav_45_2 
मराठवाडा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये एकनाथ खडसे यांचे स्वागत

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : एकनाथ खडसेंचा प्रवेश होणे महाविकास आघाडीसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचा मी महाविकास आघाडीमध्ये स्वागत करित आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी प्रतिक्रिया देताना बोलले.

आज बुधवारी (ता.२१) मुख्यमंत्री उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारले असता त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काटगाव (ता.तुळजापूर) येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची बुधवारी पाहणी केली. यावेळी त्यानी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांना तातडीची मदत म्हणुन धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात पाच शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले. काटगाव येथे मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना योग्य मोबदला देणार असल्याचे सांगितले. दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक होणार असून पंचनामे पूर्ण होतील. त्यामुळे तेव्हा निश्चितपणानं मदत जाहीर करण्याचे आश्वासन त्यानी दिले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

ZODIAC SIGNS: राग आला तरी लगेच शांत होतात! ‘या’ राशीनच्या मुली असतात मनाने खूप हळव्या; ओळखा स्वभाव!

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याचा घाट, आदित्य ठाकरेंचा आरोप

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT