कोरोनाविरूद्धच्या लढाईत चिखलीकर सरसावले 
मराठवाडा

कोरोनाविरूद्धच्या लढाईत चिखलीकर सरसावले

अभय कुळकजाईकर

नांदेड - देशासह राज्यात आलेल्या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देण्यासाठी व कोरोनाला परतवून लावण्यासाठी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत काम करण्यास सुरूवात केली आहे. खासदार निधीचा सदुपयोग करत खासदार चिखलीकर आणि त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोरगरिब आणि गरजूंच्या मदतीला धावून जात आहेत. 

कोरोनाच्या विरुद्ध सगळे जण आपआपल्या परीने लढा देत आहेत. खासदार चिखलीकर यांचे समर्थक देखील ‘हम भी कुछ कम नही’ अशी आकांक्षा बाळगत कोरोनाविरूद्ध लढत असून त्यांच्या पाठीवर थाप देण्याचे काम चिखलीकर यांनी केले आहे. 
 
हेही वाचा - धर्माबादेत पाचशे रुपायांसाठी जीव धोक्यात

मास्क, सॅनिटायझरचे वाटप 
देशासह राज्यात कोरोना विषाणूजन्य आजार पसरण्यास सुरुवात झाली असून अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा वेळी आपणही समाजाचे काही देणे लागतो. समाजाने आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपणही मदतीला आले पाहिजे, ही मानसिकता मनी बाळगत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मास्क, सॅनिटायझर, यांचे वाटप सुरू केले आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांची घेतली भेट
खासदार चिखलीकर यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना साहित्याचे वाटप केले आहे. याशिवाय आपल्या पोलिस स्थानकात कशाची कमी आहे, याची तळमळीने चौकशी करत आहेत. बुधवारी खासदार चिखलीकर यांनी मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील पोलिस स्थानकाला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर याचे वाटप केले. त्यानंतर येथील कर्मचाऱ्यांची समस्या जाणून घेतली. येथील कर्मचाऱ्यांनी पिण्यासाठी शुद्ध पाणी नसल्याचे सांगितल्यानंतर खासदार चिखलीकर यांनी आपल्या खासदार निधीतून आरो मशिन देण्याचेही आश्‍वस्त केले. त्याचबरोबर देगलूर तालुक्यातील मरखेल पोलिस स्थानकाला दोन संगणक देण्याचेही आश्‍वासित केले. यासाठीच्या निधीचे पत्रही दिले.

भोकर पोलिस ठाण्याला भेट 
खासदार चिखलीकर यांनी भोकरला गुरूवारी भेट दिली. शहराबाहेर पाल टाकून राहणाऱ्या कुटुंबियांना सोशल डिस्टन्सिंग ठेवत धान्याचे वाटप केले. त्यानंतर कोरोनाविरूद्ध लढाईत अग्रेसर असलेल्या आशा वर्कर यांनी आम्हाला असेच काम करावे लागत आहे, असे सांगितल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा पुरवठा मी स्वतः करेल, असे सांगितले. भोकर पोलिस स्थानकात गेल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप खासदार चिखलीकरांनी केले. भोकर येथील पोलिस स्थानकाला तीन संगणक देण्याचेही आश्‍वस्त केले. खासदार चिखलीकर यांनी कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर सामाजिक बांधिलकी ठेवत कौतुकाची थाप दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी देखील आनंद व्यक्‍त केला.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT