corona 
मराठवाडा

कोरोनाच्या भीतीने वसमत तालुक्‍यात नागरिकांचा परतीचा प्रवास 

सकाळ वृत्तसेवा

वसमत ः शहर व तालुक्‍यात आतापर्यंत विविध राज्यातून दोन हजार २७ नागरिक आले असून त्‍यात काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ते सर्वजन आपआपल्या घरी आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.

वसमत शहर व तालुक्‍यात कामानिमित्त कर्नाटक, नागपूर, पुणे, रायगड, मुंबई, नाशिक, हैदराबाद येथे गेलेले नागरिक त्‍याच्या घरी आले असून यात विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. मात्र, या नागरिकांकडे संशयाने बघितले जात आहे. यातील २५ ते २६ जणांना सर्दी, खोकला आहे. मात्र, त्‍याबाबत घाबरण्याचे काही कारण नाही. ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहेत. 

नागरिकांनीदेखील स्‍वतः जावून तपासणी करावी
प्रत्‍येक गावात ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस पाटील यांनादेखील सूचना देण्यात आल्या आहेत. बाहेरगावांतून कोणी आले असेल तर त्‍यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावे, असे त्‍यांना सांगण्यात आले आहे. नागरिकांनीदेखील स्‍वतः जावून तपासणी करावी. आतापर्यंत तपासणी केलेल्या सर्वाचे रिपोट निगेटिव्ह असल्याची माहिती श्री. फुलारी यांनी दिली. 

शेवाळा येथे शंभर गावकरी आलेत बाहेरगावांतून
शेवाळा ः कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा येथील अनेक गावकरी कामानिमित्त पुणे, मुंबई आदी शहरांत गेले होते. ते आता गावात परतले असून यात शंभर गावकऱ्यांचा समावेश आहे. त्‍यांची नोंदणी आशा वर्कर यांनी केली. मात्र, त्‍यांच्या तपासणी केली नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
‘कोरोना’ या विषाणुजन्य रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने देशात आपत्ती निवारण कायदा लागू केला असून आरोग्य विभागाला गावात बाहेरून आलेल्यांची तपासणी करण्याचे सक्त आदेशही दिले आहेत. शेवाळा ग्रामपंचायतीकडून गावात जनजागृती केली जात आहे. मात्र, शेवाळा येथील आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. माने यांना विचारले असता त्या म्हणतात की, आशा वर्कर यांनी त्यांची नोंदणी केली आहे. शेवाळा येथील जवळपास शंभर नागरिक मुंबई, पुणे, औरंगाबाद, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी कामासाठी गेले असून ते सध्या गावांत आल्याचे सरपंच अभय सावंत व ग्रामविकास अधिकारी पी. डी. जाधव यांनी सांगितले.

बाहेरगावाहून आलेल्यांची तपासणी करावी
शेवाळा येथील जवळपास १०० नागरिक मुंबई, पुणे, औरंगाबाद, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी कामाला गेले होते. ते शेवाळा गावात परत आले आहेत. त्यांची तपासणी करण्यात यावी, अशी सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. - अभय सावंत, सरपंच. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT