file photo 
मराठवाडा

दहावी-बारावीच्या उत्तरपत्रीकांची घरीच होणार तपासणी 

कैलास चव्हाण

परभणी : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय  फेब्रुवारी-मार्च मध्ये पार पडलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या  उत्तर पत्रीका शिक्षकांना घरीच बसून तपासणी करण्यासाठी देण्याचे आदेश माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दिले आहेत.
सर्वत्र ‘कोरोना’ विषाणुमुळे हाहाकार उडाला आहे. शाळा-महाविद्यालयांना मार्च महिण्याच्या सुरुवातीलाच सुट्या देण्यात आल्या आहेत. आता तर लॉकडाऊन सुरु असल्याने अत्यावश्यक वगळता सर्व शासकीय, खासगी कार्यालय देखील बंद करण्यात आली आहेत. या सर्व गोष्टीचा फटका परिक्षांना देखील बसला आहे. नुकतीच  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा ता.१८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा ३ मार्च ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आली. ता.२३ मार्च रोजी होणारा भुगोल विषयाचा पेपर स्थगीत करुन पुढे घेण्यात येणार आहे.


गैरप्रकार होण्याची शक्यता
ज्या विषयांची परिक्षा पार पडली त्यांच्या उत्तरपत्रीका शिक्षकांना घरीच बसून तपासणीची मुभा देण्यात आली आहे. उत्तरपत्रीका मुल्यांकन व नियमन करण्यासाठी पूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांच्या नावाने उत्तर पत्रिकांचे पार्सल पाठविले जायचे. याचे काम परिक्षक व नियामक यापूर्वी घरी करत असत. पण या पध्दतीत गोपनीयता राखली जात नव्हती. यातून गैरप्रकार होण्याची शक्यता विचारात घेत या गोष्टींना आळा बसण्याकरीता उत्तरपत्रीका मुल्यांकन व नियमनाच्या कामात गोपनीयतेसाठी तसेच उत्तरपत्रीका तपासणीसाठी विलंब होऊ नये या करीता हे काम नियुक्त परिक्षक व नियामक कार्यरत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात करण्याची कार्यपध्दती सर्व विभागीय मंडळात ऑक्टोबर २०१७ पासून राबविण्यात येत आहे.


निकाल वेळेत देण्यासाठी निर्णय
मात्र आता कोरोनामुळे सर्व कार्यालयांना सुट्या आहेत. शिक्षकांना देखील सुट्या दिल्या आहेत. त्याचा परिणाम उत्तरपत्रिका तपासणीवर होऊ शकतो. हे ओळखुन  घरीच पेपर तपासणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या परिक्षेपुरताच घरी उत्तर पत्रिका तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. निकाल वेळेत देण्यासाठी निर्णय उत्तरपत्रीका मोजून व सुस्थीतीत असल्याची खातरजमा करून शिक्षकांनी मुख्याध्यापकाकडून ताब्यात घ्याव्यात. घरात काम करतांना पूर्णत: गोपनीयता व सुरक्षीतता राखली जाईल याची शिक्षकांना दक्षता घ्यावी लागणार आहे. याचे काम वेळेत पूर्ण करून त्या संबंधीताकडे वेळेत हस्तांतरीत कराव्यात अशा सुचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. मंडळाच्या राज्य सचिवांनी याबाबत सर्व विभागीय मंडळांना पत्र पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT