nanded photo 
मराठवाडा

मराठवाड्यातील हवामान बदलू शकते : कसे, ते वाचलेच पाहिजे

शिवचरण वावळे

नांदेड : काही वर्षापासून मराठवाड्यातील हवामान झपाट्याने बदलत आहे. नागपूर, चंद्रपूरनंतर परभणीचे तापमान सर्वाधिक असते. या वर्षात यात अधिकची भर पडणार आहे. तेव्हा मराठवाड्यातील बदलत्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेवून मराठवाडा हे हवामान बदलाचे सर्वात मोठे संशोधन (केस स्टडी) केंद्र व्हावे’, अशी अपेक्षा पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली.

तरुणाई रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत
पीपल्स महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘पर्यावरणीय अणिबाणी आणि मराठवाडा’ या विषयावर श्री. देऊळगावकर बोलत होते. ते म्हणाले की, प्रचंड बौद्धीक क्षमता असतानाही येथील शेतजमिनीवर नव्याने संशोधन होत नाही. वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने शेती करणे सुरु आहे. परिणामी, मराठवाड्यातील शेतकरी नापिकी, कर्जबाजारी आणि आस्मानी संकटाला कंटाळुन आत्महत्या करत आहेत. शेकडो महिला विधवा होत आहेत. तरुणाई रोजगाराच्या शोधात स्थलांतर करत असून, भविष्यात यात वाढ होण्याची भितीही श्री. देऊळगावकर यांनी व्यक्त केली.

सेल्फीश जगाची विध्वंसेकडे वाटचाल
देशातील संशोधनाचा वापर केवळ चंद्रावर जाण्याइतक्याच मर्यादित न राहता, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उपायोजना, आधुनिक शेती पद्धतीचा वापर, जमिनीचा पोत सुधारणे, पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी ठोस संशोधन होण्याची खरी गरज आहे. वर्षभरात पाच हजार शेतकऱ्यांनी जिवन संपवले आहे. त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न कधीच कुणाला का भेडसावत नाही? आजुबाजुला होत असलेला हवामानातील बदल आपण वेळीच लक्षात घेवून सावध झालो नाही तर, सेल्फीश जग आपल्याला एक दिवस विध्वंशतेकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.

अर्थशास्त्र-समाजशास्त्राचे संपूर्ण ज्ञान मिळावे
विकास सर्वांनाच हवा असतो. परंतु, वाढते तापमान आणि पर्जन्यमानात जो विकास टिकुन राहु शकत नाही; त्याला विकास कसा म्हणता येईल असा प्रश्‍नही श्री. देऊळगावकर यांनी उपस्थित केला. विद्यापीठस्तरावर सध्या अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र हा अभ्यासक्रम परिपूर्ण शिकविल्या जात नाही, हेच आपले दुर्दैव आहे. आत्तापर्यंत आम्हाला केवळ अणूबॉम्बची भिती होती. परंतु, भविष्यात अणुबॉम्ब सोबतच पर्यावरण बदलाची देखील तितकीच भिती निर्माण झाली आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. त्यात ग्लोबल वॉर्मिंग बद्दल एक शब्दही उच्चारला गेला नाही. मोबाईलचे सेल्फीश जग अभासी दुनियेकडे घेऊन जात असल्याची खंतही श्री. देऊळगावकर यांनी व्यक्त केली.

महाराष्‍ट्रातील ४९ नद्या अस्वच्छ
महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या आहवालात महाराष्ट्रातील ४९ नद्यांमध्ये गटाराची घाण पाणी सोडले जात, असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे हेच गटाराचे पाणी पुन्हा पिण्यासाठी विविध स्त्रोताच्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचते. त्यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो आहे. रोजच अन्न धान्यातुन फळे भाज्यातुन विषारी अन्न शरीरात जातच आहे.

भविष्यात तापमान वाढणार
जंगल तोडीमुळे जगाला धोका निर्माण झाला असून, प्राणवायु देणारे जंगले नष्ट होत आहेत. दिल्लीसारख्या शहराची ‘स्लो पॉयझन’ची राजधानी म्हणून ओळख निर्माण होत आहे. ग्लोबल वार्मिंगच्या धोक्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यातील किमान तापमान ४५ आणि कमाल ६० अंश सेल्सिअस तापमान होईल. परिणामी पक्षी झाडावरुन मरुन पडतील तर माणसांना उष्णतेचे चटके सहन करावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT