CM eknath shinde and devendra Fadanvis stop visits and help farmers Ajit Pawar hingoli sakal
मराठवाडा

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री यांनी दौरे थांबवत शेतकऱ्यांना मदत करावी - अजित पवार

सततच्या होणाऱ्या पावसामुळे, अतिवृष्टी मुळे शेतकरी उध्वस्त झाला असून शेतकरी जनावरे मरत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सत्कार घेत फिरत आहेत त्यांनी दौरे थांबवून शेतकऱ्यांना मदत करावी

मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा (जि.हिंगोली) : सततच्या होणाऱ्या पावसामुळे, अतिवृष्टी मुळे शेतकरी उध्वस्त झाला असून शेतकरी जनावरे मरत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सत्कार घेत फिरत आहेत त्यांनी दौरे थांबवून शेतकऱ्यांना मदत करावी असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी डोंगरकडा येथील कार्यक्रमात शनिवारी ता. ३० केले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अतिवृष्टी ग्रस्त भागांचा दौरा सुरू केला असून यानिमित्त ते कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आले असता त्यांनी येथील केळी बागांचे व सोयाबीन पिकाची झालेले नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी सोबत माजीमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, रमेश आडकिने, दत्तराव अडकिने, डी.एन.अडकिने,ठाकूरसिंग बावरी , डाँ. संतोष बोंढारे , शिवाजी शिंदे पुयनेकर , शेख शोएब , योगेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते .

यावेळी पवार म्हणाले की , सध्या मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यातच व्यस्त आहे . राज्यात शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढवले असून , त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता त्यांचे दिल्ली दौरेच सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी. सरकारने प्रत्येक जिल्हयासाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करून नुकसानीची माहिती घ्यावी. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन मोठा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोठे आहेत हे कळायला मार्ग नाही . सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुंबईत बेशिस्तपणा वाढला... राज ठाकरेंनी का घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट? सादर केला मुंबईचा विकास आराखडा

Gadchiroli Flood: पूरग्रस्त गडचिरोलीत हाहाकार; मुख्याध्यापकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू

Temghar Dam : टेमघर धरणग्रस्तांना दोन महिन्यांत मोबदला; न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षा

Mother Daughter Drown : दुर्दैव! मुलीला बुडताना पाहून आई वाचवायला गेली अन् दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ

Birla Group: कुमार मंगलम बिर्ला स्वस्तात शेअर्स का विकत आहेत? एका वर्षापूर्वीच खरेदी केली होती कंपनी

SCROLL FOR NEXT