cm eknath shinde meet manoj jarange patil 
मराठवाडा

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री यशस्वी! 17 दिवसांनी उपोषण थांबलं पण...

कार्तिक पुजारी

जालना- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी आंदोलन स्थळी पोहोचतात मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेले १७ दिवसांपासून सुरु असलेले उपोषण आता थांबणार आहे.

मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे. असे असले तरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. मुख्यमंत्री जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यात यशस्वी झालेत. पण, आरक्षण एक महिन्यात न मिळाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय.

मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी माघार घेणार नाही. समाजाला विचारुन मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील असा मला विश्वास आहे. त्यांनी येथे येऊन ते सिद्ध केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय, असं जरांगे म्हणाले.

अंतरवाली सराटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुंबरे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर इत्याही नेते उपस्थित होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Latest Marathi Breaking News: कामातील निष्काळजीपणा भोवला, दोन अभियंते निलंबित

SCROLL FOR NEXT