Collector Aanchal Goyal sports development khelega india to badhega india sakal
मराठवाडा

क्रीडा विकासासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल सरसावल्या

जिल्ह्यातील क्रीडा संघटकांच्या बैठकीतून घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा

परभणी : खेलो इंडिया स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व फारसे दिसून आले नाही, याचा आढावा घेऊन जिल्ह्यातील खेळ व खेळाडूंच्या विकासासाठी आता जिल्हाधिकारी आंचल गोयल सरसावल्या असून खेळ व खेळाडूंच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात त्यांनी शुक्रवारी (ता. १८) जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली.

''खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया'', या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत १७ व १९ वर्ष वयोगटात व २३ क्रीडा प्रकारात खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेतून एक हजार मुला-मुलींची निवड करण्यात येऊन त्या खेळाडूच्या विकासासाठी प्रतिवर्षी पाच लाख रुपये दिले जातात. त्याच बरोबर पायाभूत खेळाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी सुध्दा राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालयांना कोट्यावधी रुपये देण्याची तरतुद आहे. परंतु काही वर्षापासून सुरु असलेल्या या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व मात्र नगण्य असल्याचे दिसून आल्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यासाठीची कारणे शोधण्यासाठी थेट एकविध खेळ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यावर साधक बाधक चर्चा केली. या बैठकीत अनेकांनी तालुका क्रीडा संकुले निर्माण झाली पाहिजेत, झाली त्यांच्यामध्ये सुविधा दिल्या पाहिजेत, खेळांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, बँकांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्पर्धांसाठी निधी मिळाला पाहिजे, क्रीडांगणे विकसित करण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.

तालुका क्रीडा संकुलांचा प्रश्न मार्गी लावू

जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलांचा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळला आहे. अनेक तालुक्यात जागाच मिळत नाहीत तर जिथे जागा आहेत, तेथे संथगतीने कामे सुरु आहेत. त्यामुळे खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळत नाही. या संकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे व त्यासाठी ता. ११ मार्च रोजी संबंधीत अधिकारी, क्रीडा संघटकांची बैठक ठेवण्याचे आदेश श्रीमती गोयल यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांना दिले.

यावेळी विविध एकविध संघटनांचे शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त मंगल पांडे, डॉ. विवेक नावंदर, रवी पतंगे, मोहम्मद एकबाल, जिल्हा शारीरिक संघटनेचे अध्यक्ष रणजीत काकडे, सचिव कैलास माने, राजेश शहाणे, गणेश माळवे, मधुकर क्षीरसागर, धनजंय बनसोडे, प्रसन्नजीत बनसोडे, पांडूरंग अंभोरे, सय्यद शकील, तुकाराम ठोंबरे, महेश काळदाते, कैलास टेहरे, विश्वास पाटील, क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, धीरज नाईकवाडे आदींची या बैठकीस उपस्थिती होती.

कोरोनामुळे क्रीडा क्षेत्र ठप्प

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्र देखील ठप्प झाले आहे. त्याला चालणा देण्यासाठी आता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुढाकार घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातून उमटत आहे. परंतु या कार्यालयात देखील क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक यांची वानवा आहे. काही प्रतिनियुक्तीवर आहेत तर काहींच्या बदल्या झालेल्या आहेत. त्यामुळे अगोदर क्रीडा अधिकारी कार्यालयाच सक्षम करणे गरजेचे असून त्याशिवाय व मानसिकता बदलाशिवाय शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT