NND17KJP02.jpg 
मराठवाडा

जिल्हाधिकाऱ्यांनी अडचणीवर केली ‘अशीही’ मात   

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वसामान्यांसह जिल्ह्याची धुरा सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन या प्रशासकीय प्रमुखांना बसला आहे. मागील २५ दिवसांपासुन केस कर्तनालयाचे दुकान बंद असल्याने आपल्या चिमुकल्याचे केस स्वत: कापले आहेत. प्रतिबंधात्मक काळात अडचणीवर कशी मात करावी, यांचा संदेशच जिल्ह्यातील नागरिकांना डॉ. विपीन यांनी स्वकर्तृत्वातून दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस काम
भारतीय प्रशासकीय सेवेतील महत्त्वाचे पद असलेल्याने  जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्याचा कारभार चालवावा लागतो. अशातच कोरोना विषाणूमुळे देशासह राज्यावर पर्यायाने जिल्ह्यावर आलेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन मागील दोन महिन्यांपासून पार पाडत आहेत. केंद्र तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे काम दिवस-रात्र करण्याचे काम ते करत आहेत. 

विविध निर्बंध लागू
साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार अधिसुचनेनुसार प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून जिल्हाधिकाऱ्यांना घोषित केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्यासाठी विविध निर्बंध (बंदी) जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन यांना निर्गमित करावे लागले आहेत. तसेच त्याची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांच्या अधिनस्त यंत्रणा करत आहे.

सर्व आस्थापना बंद
नांदेड जिल्‍ह्यातील सर्व आस्थापना ता. ३ मे पर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेशित करण्‍यात आले आहे. जिल्‍ह्यात फौजदारी संहिता दंडप्रक्रियेचे कलम १४४ अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश पारीत करण्‍यात आला आहे. यामुळे शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्‍था, खासगी शिकवणी, अभ्‍यासिका केंद्र, शहरी हद्दी लगतच्‍या शैक्षणिक संस्था, जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खासगी शैक्षणिक संस्‍था, महापालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी अंगणवाड्या, चित्रपटगृह, तरणतलाव, व्‍यायाम शाळा, नाट्यगृह, म्‍युझियम, शॉपिंग मॉल, आठवडे बाजार, जिल्‍ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाड्या, आधार केंद्र, सर्व बॅंकांतून अनुदान व पीकविमा वाटप, सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांतील दस्‍तनोंदणी बंद करण्यात आले आहे.

केस कर्तनालय बंदचा फटका
जिल्ह्यातील सर्वच केस कर्तनालयाच्या दुकानांचाही या बंदमध्ये समावेश आहे. यामुळे याचा फटका इतरांप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना बसला. त्यांचा पाचवर्षीय मुलगा आयानची कटिंग वाढल्याने तो नेहमीप्रमाणे कटिंग करण्याचा आग्रह धरत होता. यामुळे डॉ. विपीन यांनी गुरुवारी (ता. १६) स्वत:च हातात केस कापण्याचे मशीन घेऊन मुलाचे केस कापले. या बाबतचे फोटो प्रसारीत झाल्यानंतर त्यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क केला असता त्यांनी यास दुजोरा दिला आहे. संकटाच्या काळात अडचणीवर कशी मात करावी, याचे उत्तम उदाहरण जिल्हाधिकाऱ्यांनी स्वकर्तृत्वातून जिल्हावासीयांसमोर ठेवले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT