District Office nanded.jpg 
मराठवाडा

जलद कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांची ‘ही’ प्रणाली

कृष्णा जोमेगावकर

नांदेड ः प्रलंबित कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटूनही संबधीत विभागाकडून काम झाले नसल्याने नागरीकांना वारंवार त्याच कामासाठी पुन्हा भेटावे लागत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी स्टार प्रणाली विकसीत करुन यात पृष्ठाकंन झालेल्या प्रकरणाचा निपटारा तत्काळ करण्याचे निर्देश विभागाप्रमुखांना परिपत्रकाव्दारे दिले आहेत.

नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य
जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर रुजू होताच नागरीकांना भेटून समस्या मांडण्यासाठी सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंतचा वेळ दिला. यामुळे त्यांना भेटणाऱ्या अभ्यागंताची संख्या वाढली. अनेकजण आपले गाऱ्हाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट मांंडता येवू लागल्याने त्यांना आपल्या समस्या सुटतील अशी अपेक्षा होती. परंतु प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अनुभव पाहता त्यांची कामे होत नसल्याने नागरिक वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना भेटत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉ. विपीन यांनी शुक्रवारी (ता. सहा) परिपत्रक जारी केले.

गांभीर्याने घेण्यासारखी प्रकरणे ‘स्टार’मध्ये
त्यात काही प्रकरणे प्रथम प्राधान्याची व गांभीर्याने घेण्यासारखी असतात. ही बाब संबधीत विभागप्रमुखांना निदर्शनास आणून देण्यासाठी स्टार प्रणालीचा अवलंब करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी निश्चित केले आहे. या प्रणालीत स्टार पृष्ठाकंन केलेल्या प्रकरणाचा निपटारा प्राधान्याने व तत्काळ करण्याचा हा संकेत असेल, असे परिपत्रकात म्हटले आहे. यात विभाग प्रमुखांनी व्यक्तीश: लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावे.

दर सोमवारी घेणार आढावा
या स्टार प्रकरणाचा आढावा दर सोमवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी स्वत: घेणार आहेत. यामुळे संबधीत विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील प्रलंबीत असलेले स्टार पृष्ठांकित प्रकरणे निकाली काढून तसा अहवाल वेळोवेळी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले आहेत. यामुळे नागरीकांची कामे वेळेत होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डॉ. परदेशी यांची होती ‘झेड’ प्रणाली
नागरीकांची कामे वेळेत होत नाहीत, याचा प्रत्यय तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांना आला होता. त्यांनी त्यामुळे ‘झेड’ रजिस्टर प्रणाली विकसीत करुन कामाचा जलद निपटारा करण्याचे निर्देश शासकीय यंत्रणांना दिले होते. त्याचा परिणामही त्यावेळी चांगला दिसून आला होता. यावेळी डॉ. विपीन यांनी स्टार प्रणाली विकसीत करुन नागरीकांच्या समस्या वेळेत पूर्ण सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senior Citizens Property Rights : सून सासू-सासऱ्यांच्या घरात राहू शकते, पण मालकी हक्क मिळणार नाही; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Shilpa Shinde : 'हाय दैय्या!' शिल्पा शिंदे परतणार? 'अंगुरी भाभी' म्हणून 8 वर्षांनंतर पुनरागमन

Nanded News: खूनप्रकरणी बाप-लेक अटकेत; तरुणाचा खून करून विहिरीत फेकले

Mahabaleshwar News: लोकसहभागातून सुटेल मानव- वन्यजीव संघर्ष; महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांची बैठ, वन विभागासोबत चर्चा

'मी कधीही पुरस्कार विकत घेतले नाही' ट्रोलर्संना अभिषेकचं उत्तर, म्हणाला...'मी मेहनतीनं सन्मान मिळवलाय '

SCROLL FOR NEXT