file photo 
मराठवाडा

‘या’ महाविद्यालयात विद्यार्थी संतापले

सकाळ वृत्तसेवा

परभणी : येथील शासकीय पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील खुल्या प्रर्वगातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रखडल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता.३०) महाविद्यालय बंद करत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

नागपूरच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान विद्यापीठ अंतर्गत असलेल्या येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्षातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता आणि राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. तब्बल दीड वर्षापासून विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाला नसल्याने वारंवार महाविद्यालय प्रशासनाला निवेदने देऊनही केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करत  विद्यार्थ्यांनी  सोमवारी (ता.३०) महाविद्यालय बंद करत महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत शिष्यवृत्ती मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.

सर्व विभागांचे कामकाज बंद

या आंदोलनात शेकडोच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे महाविद्यालयातील सर्व विभागांचे कामकाज बंद झाले असून केवळ जनावरांच्या तपासणीच्या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. जिल्ह्यात पशुंचे एकमेव शासकीय महाविद्यालय व रुग्णालय असल्याने जिल्हाभरातून आजारी जनावरांची तपासणी येथे केली जाते. त्यामुळे आंदोलन उद्याही कायम राहील्यास या आंदोलनाचा परिणाम या सेवेवर होण्याची शक्यता आहे.

या आहेत मागण्या
सन २०१८-१९ चे डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता व छत्रपती राजर्षी शाहु महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेअंतर्गत मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही त्वरित व एकदाच मिळावी, सन २०१६-१७ चे छत्रपती राजर्षी शाहु महाराज शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजनेचे उर्वरीत १५ टक्के रक्कम तात्काळ द्यावी, आदीं मागण्यांचा समावेश आहे.

अधिष्ठाता नागपूरला 
महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा प्राचार्य  डॉ. नितीन मार्कंडेय हे बैठकी निमित्त नागपूरला विद्यापीठात गेल्याची माहीती आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच प्रभारी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. देशमुख यांनी या आंदोलनावर बोलण्याचे टाळले.

हेही वाचा : घोरपडीने शेपुट मारल्यास...

आंदोलन सुरु राहणार 

जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. आम्ही शिष्यवृत्तीबाबत महाविद्यालय प्रशासनास वारंवार कळवले होते. परंतु, केवळ अश्वासन दिले जात असल्याने विद्यार्थी संतापपले असून त्यातून आंदोलन केले जात आहे.
डॉ.आकाश साकळकर,विद्यार्थी 

 


असंख्य विद्यार्थी लाभापासून वंचीत 
 

आमची शिष्यवृत्ती विद्यापीठाकडे जमा होऊनदेखील विद्यापीठातील शिष्यवृत्ती विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिष्यवृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाही. महाविद्यालय प्रशासनदेखील कोणतीही हालचाल करत नाही. त्यामुळे असंख्य विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचीत राहीले आहेत.

डॉ. शाम संवडकर, विद्यार्थी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT