फोटो 
मराठवाडा

रस्ता अपघात सुरक्षेसाठी ‘या’ स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : रस्ता सुरक्षा अभियानच्या निमित्ताने नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खुल्या असून स्पर्धेमधील विजेत्यांना परिवहन कार्यालयाकडून पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

केंद्र शासनाने ३१ वा रस्ता सुरक्षा सप्ताह ता. ११ ते १७ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित करण्याचे सूचित केले आहे. मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमघ्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येतो.

चित्रकला स्पर्धेसाठी गट व विषय
चित्रकला स्पर्धेसाठी गट व विषय पुढील प्रमाणे राहतील. छोटा गट (इयत्ता १ ली ते ४ थीपर्यत)- रहदारीचे नियम पाळा, अपघात टाळा. मध्यम गट (इयत्ता ५ ते ८ पर्यत) सुरक्षित वाहतूक. वरिष्ठ गट (इयत्ता ९ ते १२ पर्यंत) आदर्श वाहतूक व्यवस्था हा विषय राहील.

स्पर्धेच्या अटी व शर्ती 
चित्रकला स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील चित्र काढून संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांचेकडे जमा करावेत. संबंधीत शाळेच्यावतीने प्रत्येक शाळेतून एका गटासाठी पाच सर्वोत्कृष्ट चित्रांची निवड करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात बुधवार ता. १५ जानेवारीपर्यत कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करावेत. सदरील चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खिडकी क्र. ७ वर जमा करावेत व अधिक माहितीसाठी या कार्यालयातील दुरध्वनी क्र. (०२४६२- २५९९००) व वरिष्ठ लिपीक श्री. गाजुलवाड यांचा मोबाईल क्र. ७८७५४२२२२८ वर संपर्क करावा. स्पर्धेचा निकाल वृत्तपत्रामधुन व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी कळविले आहे. 
 
निबंध स्पर्धेसाठी गट व विषय
मध्यम गट (इयत्ता ५ ते ८ पर्यत) रस्ते सुरक्षा हे घोषवाक्य नसून ती जीवनशैली आहे. वरिष्ठ गट (इयत्ता ९ ते १२ पर्यत) अपघातमुक्त समाजासाठी आपले योगदान.

स्पर्धेच्या अटी व शर्ती
निबंध स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील आपला निबंध लिहून संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांचेकडे जमा करावेत. संबंधीत शाळेच्यावतीने प्रत्येक शाळेतून एका गटासाठी तीन सर्वोत्कृष्ट निबंधाची निवड करुन या कार्यालयात बुधवार (ता. १५) जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करावेत. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT