hingoli photo 
मराठवाडा

शेतकऱ्यांना दिलासा: कृषी सेवा केंद्र दररोज राहणार सुरू

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्‍ह्यातील परवानाधारक कृषी सेवा केंद्र दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात सुरू ठेवण्याची परवानगी जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खत, बियाणे व औषधी खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे चित्र आहे. तसेच बी-बियाणे, खत खरेदीसाठी शेतकरी बाजारपेठेत येत आहेत. मात्र, दिवसाआड भरणाऱ्या बाजारामुळे व दुपारी एक वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना खरेदीविना परत जावे लागत होते.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार सुरू

 त्यामुळे खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना अत्यावश्यक असणारे बी-बियाणे, खत, ड्रीप, स्‍प्रिंकलर व पाईप खरेदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषिविषयक कामे तसेच कृषी व बागायती कामासाठी लागणारे साहित्य विक्री व उत्‍पादन करणे, कृषी माल खरेदी - विक्री केंद्र दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात सुरू ठेवण्याची परवानगी जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे. 

नियम व अटीचे करावे लागणार पालन

मात्र, ही दुकाने सुरू ठेवण्यासाठी संपूर्ण जागेचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. तसेच कामगार व खरेदीदारांची नोंद ठेवणे, तोंडाला मास्‍क बांधणे, दोन ग्राहकांत एक मीटरचे अंतर ठेवणे, सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आले आहे.

खासगी बोअर यंत्रांना परवानगी द्या

हिंगोली : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह पिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी बोअर व बोअर दुरुस्ती करण्याच्या यंत्राची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे विंधन विहिरी घेण्यासाठी बोअर मशीन वाहनाला परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आंध्रप्रदेशचे मंत्री तंगामल के. कुप्पू स्वामी यांच्याकडे केली आहे.

आंध्रप्रदेशात अडकली वाहने

लॉकडाउनमुळे बोअर पाडणारी यंत्रे आंध्रप्रदेशात अडकली आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून बोअर मशीन (टीएन ३४ - पी ९४६४) व त्याचे पोर्टर (टीएन ३४ पी ९४०२) या यंत्रांना परवानगी द्यावी, असेही श्री. जयवंशी यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

पाणीटंचाईचे सावट

जिल्हाभरातील अनेक गावांत पाणीटंचाई संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २८ विहीरी अधिग्रहण करण्यात आल्या असून दोन गावांत पाण्याचे टॅंकर सुरू केले आहे. यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT