वाटूर ः परिसरात रखडलेले बांधकाम.  
मराठवाडा

बांधकाम व्यवसायही डबघाईला 

एकनाथ राऊत

वाटूर (जि. जालना) -  दोन-अडीच वर्षांपूर्वीची नोटाबंदी, त्यानंतरच्या टप्प्यातील जीएसटीचा निर्णय या बदलांमुळे आधीच बांधकाम क्षेत्राला उतरती कळा लागली असताना कोरोनाच्‍या शिरकावाने सर्वकाही ठप्प झाले. त्‍यामुळे अनेकांचे बांधकाम अर्धवट अवस्‍थेत पडून आहे. 

सध्या अडचणीत असलेले बांधकाम क्षेत्र या लॉकडाउनमुळे पुरते झोपले आहे. गृह, व्यावसायिक तसेच पायाभूत सुविधा अशा सर्वप्रकारच्या बांधकामाच्या साईटस् सध्या बंद असून या क्षेत्रातील सर्वप्रकारचे कामगार बेरोजगार झाले आहेत.

लॉकडाऊन संपल्यानंतरही या मोठ्या धक्‍क्‍यातून बांधकाम क्षेत्राला सावरणे कठीण आहे. कारण, हा व्यवसाय मुख्यत्वे मोठ्या भांडवलावरच अवलंबून आहे. 

हे घटक थेट संबंधित बांधकाम क्षेत्रावर केवळ बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्‍ट, बांधकाम कामगारच नव्हे, तर अन्य अनेक घटक निगडित आहेत. त्यात सिमेंट कंपन्या, त्यांचे डीलर, किरकोळ विक्रेते, त्याची वाहतूक करणारे हमाल, मालवाहू वाहने, स्टील इंडस्ट्री, रंगनिर्मिती कंपन्या व त्यातील कामगार, विक्रेते, रंगकाम करणारे मजूर, फर्निचर करणारे सुतार, स्टीलवर्क करणारे, टाईल्सची इंडस्ट्री, प्लंबिंग इंडस्ट्री व प्लंबर, इलेक्‍ट्रिकल्स साहित्य, इलेक्‍ट्रिशियन, इंटिरिअर डेकोरेटर्स, काच विक्रेते व त्यावर काम करणारे कारागीर यासह अन्य घटकही या क्षेत्राशी संबंधित आहेत. 

ग्रामीण भागात बांधकामे ठप्प आहेत. हाताला कामे नाहीत. रोजगारच नसल्‍याने उपासमारीची वेळ आली आहे. 
- अनंता माने, 
बांधकाम कारागीर, वाटूर 

बांधकाम व्यावसायिकांवर सर्व छोटे-मोठे व्या‍यवसायिक अवलंबून असतात. लॉकडाउनमुळे इलेक्ट्रिकल व्यवसायात मंदी आली आहे. 
- भागवत गायकवाड, इलेक्ट्रिशियन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT