file photo 
मराठवाडा

विधायक : पेबल आर्टच्या माध्यमातून पवार दाम्पत्याचा सामाजिक संदेश

जगदीश जोगदंड

पूर्णा (जिल्हा परभणी) : वझुर (ता. पूर्णा) येथील पेबल आर्टीस्ट प्रल्हाद पवार व मोहिनी पवार या दाम्पत्याने लॉकडाऊन कालावधीतील वेळेचा सदुपयोग करून पेबल आर्टच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. त्यांनी काढलेल्या चित्रांची सर्वत्र मागणी होत असून विद्यापिठानेही कौतुक केले आहे.

प्रल्हाद पवार व मोहिनी पवार यांनी प्रचंड अभ्यास करून व परिश्रम घेत पेबल आर्ट ही कला आत्मसात केली आहे. मुळातच त्यांची कलात्मक दृष्टी असल्याने ते या आगळ्यावेगळ्या कलाप्रांताकडे आकर्षित झाले. व त्यांनी स्वतःला झोकून देत ही कला जोपासली. हलाखीची परिस्थिती असल्यामुळे काम करत करत शिक्षण घेऊन सतत धडपड करत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभागही नोंदवला आहे. मागील तीन वर्षांमध्ये मुख्यमंत्री फेलोशिप या ड्रीम प्रोजेक्टमध्ये मुख्यमंत्री ग्राम प्रवर्तक म्हणून काम करत होते. त्यामुळे कलेतून सामाजिक कार्य करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. या फेलोशिपमध्ये मागील तीन वर्षांमध्ये ज्या गावांमध्ये त्यांनी काम केले त्या गावातील कार्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य.

पेबल आर्ट ही कला जोपासली

सामाजिक कार्यात विविध संदेश देण्यासाठी त्यांनी तिथेच न थांबता पेबल आर्ट ही कला जोपासली. ही कला मुळ पाश्चात्त्य देशातली आहे. वझुर येथील गोदावरी नदीच्या पात्रातील विविध आकाराच्या गारगोटी, दगड वापरून तसेच लाकूड, काडी यांचा कौशल्यपूर्वक वापर करून अतिशय सुबक व सुंदर आशयघन अशा सामाजिक संदेश देणाऱ्या फ्रेम त्यांनी बनविल्या आहेत.

पेबल आर्ट फ्रेम विक्री शुभारंभ कुलगुरू डॉ.अशोक ढवन यांच्या हस्ते

सदर फ्रेम ह्या भिंतीवर लावण्यासाठी, लग्नप्रसंगी, वाढदिवस, लग्न वाढदिवस तसेच कोणत्याही शुभ प्रसंगी तसेच सत्कार कार्यक्रमात भेट देण्यासाठी एक आठवण म्हणून देता येतील. आजच्या काळात ही कला युवकांना एक उद्योग म्हणूनही साकारता येईल. प्रल्हाद भगवानराव पवार व मोहिनी पवार या दाम्पत्याने तयार केलेल्या पेबल आर्ट फ्रेम विक्री शुभारंभ कुलगुरू डॉ.अशोक ढवन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रमेश पवार हे उपस्थित होते. या दाम्पत्याने लॉकडाऊन कालावधीतील वेळेचा सदुपयोग करून केलेल्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही आगळीवेगळी कला जोपासणाऱ्या ग्रामीण भागातील या कलावंत जोडप्याला समाजाने प्रोत्साहन द्यायला हवे.

समाजमनाने या कलावंताला उत्तेजन द्यायला हवे

पेबल आर्ट ही एक कला आहे. या कलेचा छंद जोपासून सामाजिक संदेश देण्याचे ते  प्रभावी माध्यम आहे. प्रल्हाद पवार व त्यांच्या अर्धांगिनी मोहिनी पवार उत्तमोत्तम कलाकृती साकारल्या. वेळेचा सदुपयोग, कला व समाजशिलतेचे ते उत्तम उदाहरण आहे. समाजमनाने या कलावंताला उत्तेजन द्यायला हवे.

 - डॉ.अशोक ढवण, कुलगुरु, कै.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT