सेलू (जि.परभणी) : खादगाव ( भाबट ) शिवारात सतत पाऊस पडत असल्याने कापसामध्ये पाणीच पाणी झाले आहे. 
मराठवाडा

सेलू तालुक्यात सततच्या पावसाने शेती खरडली, पिके गेली

विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : सततच्या पावसाने तालुक्यात (Selu) कापूस, सोयाबीनसह इतर पिके जमीनदोस्त झाली. नदीकाठची शेती पुराच्या पाण्याने खरडून गेली आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातोंडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या ही वर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पीकांची तिच दैना होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे आर्थिक गणिते कोलमडून गेली आहेत. तालुक्यात होत (Rain In Parbhani) असलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीनसह कापसाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन शेतकर्‍यांना अतिपावसामुळे काढता येत नाही. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे (Soybean) पीक वाचविण्यासाठी आटापीटा केला. परंतु मागील पंधरा तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे कापणीला आलेले सोयाबीनचे पीक धोक्यात आले.

मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे बऱ्याच गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या पिकांना परिपक्व असलेल्या सोयाबीनच्या शेंगांना दुबार कोंब फुटले असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीनसह कापसाचे पीक पाण्यातच आहेत. सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पाण्यातील सोयाबीनला पुन्हा कोंब फुटत आहेत. तर कापसाचे बोंड सडत आहेत. गेल्या आठवड्यापासून रात्रीच्या वेळेस जोराचा पाऊस पडला. त्यामुळे मागील आठवड्यामध्ये अंतर्गत कामांसाठी शेतामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पीकांचे मोठे नुकसान झाले. या वर्षी तरी खरिपांची पीक हातात येतील अशी अशा होती. परंतू याही वर्षी सततच्या पावसामुळे खरिपाची पीक हातातून गेल्यातच जमा झाले आहे.

— गुलाब शिंदे, म्हाळसापूर (ता.सेलू,जि.परभणी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT