सहकारी संस्थांच्या निवडणूका
सहकारी संस्थांच्या निवडणूका sakal
मराठवाडा

Parbhani Update : सेलूत सहकारी संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होणार

विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : गाव पातळीवर ग्रामपंचायतीनंतर अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी आणि गाव पुढाऱ्यांचा कस लावणारी निवडणूक म्हणून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. सेलू (Selu) तालुक्यातील ३१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकाच्या (Cooperative Societies Election) मतदार याद्याचे कामे तपासून पुर्ण झाली आहेत. परंतू गट सचिवांच्या संपामुळे निवडणुकीचे कामे रखडली होती. गटसचिवांचा संप अखेर मिटला असल्याने येत्या फेब्रुवारी महिन्यातच सोसायटीच्या निवडणुकीचे कामे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सेलू तालुक्यातील ३१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळांची निवडणूक ३१ मार्च २०२२ पूर्वी घ्याव्यात असे प्राधिकरणाचे आदेश आहेत. (Cooperative Societies Election In February In Selu Taluka Of Parbhani)

त्या अनुषंगाने संबधित विभाग युध्दपातळीवर तयारी लागला आहे. अलीकडे कोणतीही निवडणूक म्हटलं की, त्यावर होणारा खर्चही वाढला आहे. ओल्या पार्ट्या आणि मतदारांच्या वाढलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. एक तर अनेक सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या आहेत. त्यातच संस्थेला निवडणुकीचा खर्च परवडणारा नाही. तालुक्यातील ३१ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या मतदार यादी तपासणीचे कामे पुर्ण झाली आहेत. परंतु गट सचिवांच्या संपामुळे निवडणुकीचे (Parbhani) कामे खोळंबली होती.

अखेर गटसचिवांचा संप मिटला असून येणार्‍या फेब्रुवारी महिन्यात सोसायटीच्या निवडणुकीचे कामे सुरू होणार असून तीन महिन्यात सर्व कामे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर सेलू कृषी उत्पन्न बार समितीची निवडणूक लागणार असल्याची माहिती सहायक दुय्यम निबंधक माधव यादव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT