covid 19 covid 19
मराठवाडा

चिंताजनक! मराठवाड्यात सलग दोन दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढली

औरंगाबाद जिल्ह्यात ११५ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील २६, ग्रामीण भागातील ८९ जण आहेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात गुरुवारी (ता. २४) दिवसभरात ४८७ कोरोनाचे रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेल्या रुग्णसंख्येत बीड १५१, औरंगाबाद ११५, उस्मानाबाद ८०, परभणी ५१, लातूर ४०, जालना २४, नांदेड २०, हिंगोली ६ जणांचा समावेश आहे. आणखी आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात बीडमधील चार, औरंगाबादेत दोन, परभणी- उस्मानाबादेतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

औरंगाबादेत ११५ बाधित-
औरंगाबाद जिल्ह्यात ११५ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील २६, ग्रामीण भागातील ८९ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ७८१ झाली. आणखी १०० जण बरे झाले. त्यात शहरातील २०, ग्रामीण भागातील ८० जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ४१ हजार ४७० रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या ९०५ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यात गारखेडा येथील पुरूरुष (वय ४५), शेवता (ता. पैठण) येथील महिलेचा (४०) समावेश आहे. आतापर्यंत ३ हजार ४०६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT