hingoli photo 
मराठवाडा

कोरोनाच्या संकटातही शोधली रोजगाराची संधी

राजेश दारव्हेकर

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प पडले आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनला आपत्ती न मानता यातून संधी शोधत ५२ महिला बचत गटांमार्फत ४८ हजार मास्‍क तयार करून रोजगार निर्माण केला आहे. मास्कच्या विक्रीतून तब्बल साडेसात लाख रुपयांची उलाढाल झाली असून यातून २७८ महिला सदस्यांना रोजगार मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्‍हा व्यवस्‍थापक जे. व्ही. मोडके यांनी दिली.


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यात सहा हजार ६६३ बचत गट कार्यरत आहेत. कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर लॉकडाउन, संचारबंदीमुळे अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प पडले आहेत. याचा फटका जिल्ह्यातील महिला बचत गटांनाही बसला. 

मास्क तयार करण्याचा निर्णय

मात्र, लॉकडाउनच्या काळातही संधी शोधत जिल्ह्यातील ५२ महिला बचत गटांतील २७८ महिला सदस्यांनी वेगळा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, प्रकल्‍प संचालक धनवंतकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला. 

१६ हजार मास्‍क तयार करून देण्याची ऑर्डर

त्यानुसार ४८ हजार मास्‍क तयार करण्यात आले आहे. तसेच जिल्‍हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी १६ हजार मास्‍क तयार करून देण्याची ऑर्डर बचत गटांना मिळाली आहे. जिल्‍ह्यातील ५२ गटांना मास्‍क तयार करण्याचे काम मिळाले आहे. यातून बचत गटांच्या महिला स्‍वतः शिलाईकाम करून मास्‍क तयार करीत आहेत. जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मास्‍कचे वाटप करीत आहेत. 

२७८ महिलांना रोजगार

यासाठी अभियान व्यवस्‍थापक जे. व्ही. मोडके यांनी मास्‍कसाठी लागणारे कापड गटांना उपलब्ध करून दिले आहे. त्‍यातून आतापर्यंत ४८ हजार मास्‍कचे गावपातळीवर वाटप केले आहे. यातून साडेसात लाख रुपये मिळाले असून त्‍यातून २७८ महिलांना रोजगार मिळाला आहे. दरम्यान, जिल्‍ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना मास्‍क खरेदी करण्यासाठी गटविकास अधिकारीऱ्यांच्या स्‍वाक्षरीने पत्रदेखील पाठविण्यात आले आहे. त्‍यामुळे सर्व ग्रामपंचायत स्‍तरावर मास्‍कची विक्री होत आहे.

४८ हजार मास्‍कचे गावपातळीवर वाटप

लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाराची कामे बंद झाली आहेत. जिल्‍ह्यात बचत गटांची चळवळदेखील अडचणीत सापडली आहे. यासाठी या गटांना रोजगार मिळावा यासाठी ५२ गटांना मास्‍क तयार करण्याचे काम दिले असून त्‍यासाठी लागणारे कापड उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत या गटांनी ४८ हजार मास्‍कचे गावपातळीवर वाटप केले. यातून त्‍यांना साडेसात लाख रुपये मिळाले आहेत.
-जे. व्ही. मोडके, जिल्‍हा व्यवस्‍थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

मोठी बातमी : भारत-बांगलादेश मालिका स्थगित; रोहित शर्मा, विराट कोहली यांना ऑक्टोबरपर्यंत मिळाली सुट्टी

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

SCROLL FOR NEXT