file photo 
मराठवाडा

कोरोना इफेक्ट : चार फुटापेक्षा उंच केलेल्या गणेश मुर्तीचा खर्च पाण्यात

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  बाप्पाचे आगमन काही दिवसावर आले असुन मुर्तिकारांची कामे सुरू आहेत. यावर्षी कोरोनाचे संकट उभे टाकल्याने मुर्तिकार यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुर्तीच्या उंचीवर मर्यादा आल्याने यापूर्वी तयार केलेल्या मुर्तीसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याचे ते सांगत आहेत.

हिंगोली शहरात गवळीपुरा भागात अनेक कारागीर गणेश मूर्ती तयार करतात. अनेक वर्षापासून गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी किमान चार ते पाच महिण्यापासून हे कारागीर कामात व्यस्त असतात. मुर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जमा करणे मुर्ती तयार करण्यासाठी जागा निवडणे पावसापासून मुर्ती सुरक्षित राहील यासाठी शेड तयार करणे आदी कामात ते व्यस्त राहतात. 

कोरोनाचे सावट आल्याने गणेशोत्सवावर देखील अडचणी

हिंगोलीतील गणेश मूर्तीना जिल्हा भरासह परभणी, नांदेड, पुसद, वाशिम जिल्ह्यात मागणी असते त्याप्रमाणे आँर्डर देखील येतात. दरवर्षी दहा ते बारा फुट उंच फुटाच्या मुर्तीना मागणी अधिक असते. व अनेक ठिकाणच्या आँर्डर देखील आलेल्या असल्याने मुर्तीकार त्याप्रमाणे काम करतात. यावर्षी देखील येथील कारागीरांनी अनेक दिवसांपासून मुर्ती तयार करण्यास सुरुवात केली होती. मात्र कोरोनाचे सावट आल्याने गणेशोत्सवावर देखील अडचणी आल्या आहेत. यावर्षी चार फुट उंचीची गणेश मूर्ती असणार आहे. त्यासाठी नियमावली देखील आली आहे.

रंगाच्या किमंतीतही वाढ झाली

यामुळे येथील अनेक मुर्तीकारांनी दहा ते बारा फुट उंच केलेल्या मुर्ती आता विकता येणार नाहीत. यासाठी झालेला खर्च पाण्यात गेल्याचे मुर्तीकार सांगत आहेत. दरवर्षी एका कारागीराकडुन पाचशे ते मुर्तीची विक्री होते. आँर्डर देखील भरपूर प्रमाणात असतात यावर्षी मात्र पन्नास ते साठ आँर्डर आल्याचे कारागीर सांगत आहेत. यावर्षी मालाच्या किमंतीतही वाढ झाली आहे. मागच्या वर्षी १६० रुपयांना मिळणारी मातीची बँग दोनशे रुपयांना झाली आहे. रंगाच्या किमंतीतही वाढ झाली आहे. यामुळे गणेश मूर्तीचे भाव देखील वाढले आहेत. मात्र मागणी कमी असल्याने यासाठी केलेला खर्च निघतो किंवा नाही याची चिंता मुर्तिकाराना लागली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे व्यवसायावर परिणाम झाला

यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आँर्डर कमी झाल्या आहेत. अनेक दिवसापूर्वी कच्चा माल खरेदी केला आहे. त्यासाठी भांडवल गुंतवणूक केली मात्र खर्च निघतो का नाही याची काळजी आहे. शहरात चौकात बसून मुर्ती विकण्यासाठी देखील अडचणी येत आहेत. यासाठी पर्याय द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

- राजेश पेरिया (मुर्तिकार) 

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT