covid 
मराठवाडा

जळकोटात पुन्हा कोरोनाची 'एंट्री', दोन शिक्षक आणि दोन प्राध्यापकांना कोरोनाची लागण

शिवशंकर काळे

जळकोट (जि.लातूर): काही दिवसांपूर्वी तालुका कोरानामुक्त झाला होता. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात, व्यवसाय सुरुळीत चालू असताना अचानक शहरातील गुरुदत्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात कोरोनाचे चार कर्मचारी पॉझिटीव्ह निघाल्याने पुन्हा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने विद्यार्थी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील गुरुदत्त महाविद्यालयात आकारी व बारावीचे वर्ग गेल्या अनेक दिवसापांसून सकाळी दहा ते एक पर्यंत चालू होते. सोमवारपासून सदरील वर्ग हे सकाळी दहा ते चार चालू आहेत. दोनही वर्गात दोनशे विद्यार्थी दररोज शिकवण्या घेत आहेत. अचानक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्यांच चार जणांना कोरोना झाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सदरील महाविद्यालयातील शिक्षणांनी कोरोनाची टेस्ट केली आहे का? शासनाने दिलेले कोरोना नियम पाळण्यात आले का?नियम पाळण्यात आले असेल तर कोरोनाचा शिरकाव झाला कसा आदी प्रश्न उपस्थित होत आहेत. महाविद्यालय कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोनशे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना पुन्हा कोरोना टेस्ट करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या कुंटूबांचीही कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.

महाविद्यालयात कोरोनाबाबत दक्षता पाळली नसल्यामूळे कोरोनाचा शिरकाव झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाविद्यालयात एकूण 32 कर्मचारी आहेत यातील दोन शिक्षक व दोन प्राध्यापकांना कोरोना झाला आहे. यातील एक कर्मचारी ता.पंधरा रोजी एक तर ता.सोळा रोजी तीन रोजी कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळून आले.

गटशिक्षणाधिकारी यांनी शहरातील खाजगी व जिल्हा परिषद शाळेत कोरोना संदर्भात नियम दिलेले यांचे पालन होत आहे किंवा नाही यांची खबरदारी घेणे महत्वाची आहे. पंरतू असे होताना दिसत नसून शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यी तोंडाला मास्क न लावता फिरताना दिसत आहेत. याबाबत शिक्षण विभागाने खबरदारी नाही घेतल्यास याचा परिणाम विद्यार्थी, पालक व त्यांच्या कुंटुबावर होऊ शकतो. तालुक्यात महाविद्यालयातील चार व एका गावातील एक असे एकूण पाच रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली असता सदरील महाविद्यालयातील चार कर्मचारी कोरोना पाझिटीव्ह निघाले असून एकूण बत्तीस कर्मचाऱ्यांपैकी बावीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. ता. सतरा रोजी राहिलेल्या कर्मचारी व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयात कोरोनाचे दिलेले नियम पाळण्यात येत नाहीत.यावर शिक्षण विभागने लक्ष देण्याची गरज आसल्याचे सांगण्यात आले.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : बाळासाहेबांचे दोन शिलेदार राज-उद्धव २० वर्षानंतर एकत्र! राजकारणात काय बदल होणार? शिंदे-भाजपला कसा फटका बसणार?

अरावलीची १०० मीटरची व्याख्या काय? सुप्रीम कोर्टाने मान्य केली पण SCने स्थापलेल्या समितीनंच फेटाळलीय

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे शिवतीर्थाकडे रवाना

Vaibhav Suryavanshi: ३१ चेंडूंत १५४ धावा! वैभवचा वर्ल्ड रेकॉर्ड; एबी डिव्हिलियर्सचा सर्वात मोठा विक्रम मोडला, पहिला भारतीय ठरला

Video: बसला लटकून शाळकरी मुलांचा जीवघेणा स्टंट, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT