हिंगोली : औंढा तालुक्यातील दुधाला, अंजनवाडा या भागात गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणारी प्रयोग शाळा उभारली जाणार आहे. मात्र कोरोनाप्रदुर्भावामुळे मागील पाच महिन्यापासून कामकाज ठप्प पडले आहे. त्यामुळे लिगो प्रकल्पाला देखील कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे.
अणुऊर्जा विभागाच्या वतीने औंढा तालुक्यातील दुधाळा, अंजनवाडा, गांगलवाडी, आदी परिसरात गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास व जागतिक दर्जाचा प्रात्यक्षिक भौतिकशास्त्र या विषयावरील अभ्यास करण्यासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावरील तिसरी तर भारतातील पहिली प्रयोगशाळा लिगो इंडिया प्रकल्प उभारणार आहे.
यासाठी वन जमीन, खाजगी, सरकारी जमीन अशी मिळून जवळपास १७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून सरकारी चाळीस हेक्टरचा ताबा ही देण्यात आला आहे. खाजगी जमीन धारकांना त्यांच्या जमिनीचा मावेजा ही देण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी कामे सुरू करण्यात आल्याने मागील वर्षी शास्त्रज्ञानी येऊन पाहणी केली. तर काही ठिकाणी बोअर करून मातीचे सॅम्पल ही घेतले होते.
तसेच लिंबाळा एमआयडीसी परिसरात असलेल्या जामवाडी शिवारातील ७.८० हेक्टर जमिनीवर वैज्ञानिक व शास्त्रज्ञ यांच्यासाठी निवासस्थान उभारले जाणार आहे. ही जमीन देखील लिगो इंडिया प्रकल्पाला शासनाने काही अटी व शर्तीवर शासकीय गायरान जमीन महसूल संहिता कलम व तरतुदीनुसार भोगवटा मूल्य आकारून ऊर्जा विभागास हस्तांतरित करून एक वर्षाचा कालावधी उलटला तरी या ठिकाणी देखील निवस्थान बांधकामाच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत.
लिगो प्रकल्पाची कामे झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र मागील पाच महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्याने लिगो प्रकल्पाचे कामकाज देखील ठप्प पडले आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढतच असल्याने भारतातील विमानसेवा रेल्वेसेवा अद्यापही बंद आहे.
अंतर राष्ट्रीय विमानसेवा देखील बंद असल्याने वैज्ञानिकांना देखील भारतात येणे अशक्य झाले आहे. कोरोना संसर्ग काही कमी होण्याची चिन्हे फारशी दिसून येत नाहीत. त्यामुळे किमान एकदोन वर्ष तरी अशीच जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयोग शाळेचे कामकाज पुन्हा कधी सुरु होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.