संग्रहित चित्र. 
मराठवाडा

जालन्यात चार जवान, खासगी डॉक्टरला कोरोनाची बाधा

महेश गायकवाड

जालना - मालेगाव बंदोबस्तावरून परतलेल्या राज्य राखीव दलाच्या एका कंपनीतील चार जवान, तसेच शहरातील एका डॉक्टरचा अहवाल शुक्रवारी (ता.१५) रात्री पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

जालन्यात गुरुवारपर्यंत (ता.१४) एकूण बाधित रुग्णांची संख्या १८ होती. यातील सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते.

मात्र, शुक्रवारी (ता.१५) रात्री मालेगाव बंदोबस्तावरून आलेल्या राज्य राखीव दलातील जवानांसह अन्य संशयित मिळून ८० व्यक्तींच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला.

त्यात चार जवानांसह एका खासगी डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जालन्यातील रुग्णसंख्या आता १६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सातजणांना कोरोनामुक्तीमुळे सुटी देण्यात आली आहे.

कोरोनामुक्त होऊन दोघी परतल्या घरी... 

जालना शहरातील ६५ वर्षीय महिला आणि पारध (ता. भोकरदन) येथील सतरा वर्षीय युवती कोरोनामुक्त झाल्याने शुक्रवारी घरी परतल्या. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य परिचारिकांनी टाळ्या वाजवून पुष्पवृष्टी करत दोघींना निरोप दिला. त्यांना १४ दिवस घरी अलगीकरण करून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

जिल्ह्यात ४३१ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ४३१ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यात संत रामदास हॉस्टेलमध्ये ३४, डॉ. आंबेडकर हॉस्टेलमध्ये ७, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ५, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २३, पोलिस प्रशिक्षण केंद्रात ८४, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ८, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ४ व टेंभुर्णीच्या राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल येथे ७७ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच अंबड येथील डॉ. आंबेडकर हॉस्टेलमध्ये ३६, घनसावंगीतील डॉ. आंबेडकर हॉस्टेलमध्ये २१ तर अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ४५ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. भोकरदन येथील डॉ. आंबेडकर भवन इमारतीत ६४ व डॉ. आंबेडकर हॉस्टेल क्रमांक २ मध्ये २३ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

Manchar News : कलमोडी प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास राज्य शासनाची मान्यता; आंबेगाव व खेड तालुक्यातील ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

MSRTC : गारगोटी आगाराची १८ लाख कमाई; आदमापूर यात्रेसाठी सहा दिवसांत साडेपाचशे जादा फेऱ्या

Water Plant Negligence : अन्यथा कळंबा फिल्टर हाउसच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावू; नगरसेवकांचा इशारा, ‘बी वॉर्ड’ चे दुरवस्थेवर बोट

SCROLL FOR NEXT