Corona test of 22 people is negative at Chakur district Latur 
मराठवाडा

Covid 19 : चाकूरकरांनी सोडला नि:श्वास २२ जणांचा अहवाल निगेटिव्ह

प्रशांत शेटे

चाकूर (जि. लातूर) - शहरातील आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील डॉक्टर व कर्मचारी यांचे २२ स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी (ता. दोन) रात्री या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे चाकूरकरांनी नि:श्वास सोडला.

ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त झाला आहे. शहरात हा पहिलाच रुग्ण सापडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तो राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. त्याच्या संपर्कात आलेले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यासह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील  संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. रुग्णालय दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्याच्या सोबत अनेकांचा संपर्क आला होता. या २२ व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी लातूरला पाठविण्यात आले होते. एकाच वेळी एवढ्या व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी गेल्यामुळे नेमक काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

रुग्णालयात रोज अनेकजण तपासणीसाठी येत असतात यामुळे सर्वांना भीती होती. गुरुवारी रात्री या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे चाकूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. रोहिना (ता. चाकूर) येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्वॅब पाठविण्यात आली असून, त्याचा अहवाल शुक्रवारी येणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT