corona update corona update
मराठवाडा

सहा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव ओसरला; बीड, उस्मानाबादमधील वाढ चिंताजनक

औरंगाबाद जिल्ह्यात ११ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एका रुग्णाचा मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद जिल्ह्यात ११ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एका रुग्णाचा मृत्यू झाला

औरंगाबाद: मराठवाड्यात बीड आणि उस्मानाबाद जिल्हा वगळता इतर सहा जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. २०) केवळ २२ नवे कोरोनाग्रस्त आढळले. बीड जिल्ह्यात ९३ रुग्ण तर दोन मृत्यू आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ७० रुग्णांची भर पडली. आठ जिल्ह्यांत एकूण १८५ रुग्ण आढळले. पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ११ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एका रुग्णाचा मृत्यू झाला. यात शहरातील पाच रुग्ण आहेत. उर्वरित ग्रामीणमधील आहेत. जिल्ह्यात आज २२ (शहर सहा, ग्रामीण १६) रुग्ण बरे झाल्याने सुटी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ९० हजार ७१४ असून, आणखी चार रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ८८ हजार सात रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ४६ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी एका जणाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या दोन हजार ६६१ झाली आहे.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात दिवसभरात एकही नवा रुग्ण आढळला नाही. शिवाय मृत्यूचीही नोंद झाली नाही. जालना जिल्ह्यातील विविध भागांत दोन रुग्णांची भर पडली. पाच रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे १ हजार १८५ जणांचा बळी गेलेला आहे. जिल्ह्यात एकूण ६१ हजार ६८८ बाधितांपैकी आतापर्यंत ६० हजार ४२६ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ७७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे सहा रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ९१ हजार ७८७ झाली आहे. जिल्ह्यात ७७८ जणाच्या आरटीपीसीआर टेस्ट झाल्या. यात तिघे पॉझिटिव्ह आले. तर एक हजार जणाच्या अॅँटीजेन टेस्ट झाल्या. यातही तिघे पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ हजार ७८७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ८९ हजार २२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दोन हजार ४२० जणाचा मृत्यू झाला असून १४५ जणांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT