beed corona updates beed corona updates
मराठवाडा

Corona Updates: मराठवाड्यात कोरोनाने आणखी ३७० जण बाधित

औरंगाबाद जिल्ह्यात ४२ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील १४, ग्रामीण भागातील २८ जण आहेत.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद जिल्ह्यात ४२ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील १४, ग्रामीण भागातील २८ जण आहेत.

औरंगाबाद: मराठवाड्यात बुधवारी (ता. ४) दिवसभरात कोरोनाचे ३७० रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येत बीड १८१, उस्मानाबाद ९३, औरंगाबाद ४२, लातूर ३३, जालना १५, नांदेड ६, परभणी ०, हिंगोली ० रुग्ण वाढले आहेत. दरम्यान, बीडमध्ये तीन, औरंगाबाद-जालना-उस्मानाबादेत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात ४२ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील १४, ग्रामीण भागातील २८ जण आहेत. रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ५३५ झाली. आणखी २३ रुग्ण बरे झाले. त्यात ग्रामीण भागातील १८ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ४३ हजार ७१६ रुग्ण बरे झाले आहेत. ३१२ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दहेगाव बंगला येथील पुरुषाचा (वय ७०) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत तीन हजार ५०७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

दिवसभरात आठ हजार नागरिकांनी घेतली लस-

शहरातील ४३ लसीकरण केंद्रावर बुधवारी (ता. चार) दिवसभरात सात हजार ९८० नागरिकांना लस देण्यात आली. गुरुवारी (ता. पाच) शिल्लक लसीतून नागरिकांना डोस दिले जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

महापालिकेला बुधवारी (ता. चार) कोविशिल्डच्या सात हजार ५०० तर कोवॅक्सिनच्या सहा हजार लसी मिळाल्या होत्या. त्यानुसार ४३ केंद्रावर लसीकरण करण्यात आले. दिवसभरात सात हजार ९८० नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला. शहरात आत्तापर्यंत लाख ९९ हजार २०४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. महापालिकेच्या क्रांती चौक, राजनगर आणि सिडको एन-४ मधील एमआयटी हॉस्पिटल या तीन केंद्रावर कोवॅक्सिनच्या प्रत्येकी दोनशे लस उपलब्ध असतील. कोवॅक्सिनच्या सहा हजार लसी शिल्लक आहेत पण कोविशिल्डच्या शिल्लक लसीतून एखाद्या केंद्रावर लसीकरण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Election : केंद्र–राज्य सरकारच्या निधीतून इचलकरंजीचा सर्वांगीण विकास आमदार राहुल आवाडे

World Archery Championship: साताऱ्याच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड; जागतिक तिरंदाजी स्पर्धा; साहिल, ओजस, मधुरा, आदितीचा समावेश!

IND vs NZ 2nd ODI : विराट कोहलीचं सातत्य, वाढवतंय रोहित शर्माचं टेंशन! आज असं काही घडल्यास, बसेल 'हिटमॅन'च्या साम्राज्याला धक्का

Ichalkaranji Election : इचलकरंजीचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, चंद्रकांत पाटीलांचा दावा

Latest Marathi News Live Update : नांदेड महानगरपालिकेसाठी उद्या मतदान, 81 जागेसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT