Nanded News 
मराठवाडा

लग्नासाठी आनंदाने गावी आलेले नवरोबा हिरमुसले, कसे? ते वाचाच 

विश्वनाथ कहाळेकर

नांदेड : कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशातील सर्वच व्यवसायांवर संकट कोसळले आहे. यात कामगारांचे चांगलेच हाल होत आहे. तर मातीत सोनं पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर पिकविलेला माल मातीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे.

सध्याच्या काळात लग्न म्हटल की नवरी मुलीच्या घरच्यांकडून चांगल्याच अपेक्षा वाढल्या आहेत. यात मुलगा नोकरीवाला पाहिजे. नुसता नोकरीवाला नाही, तर सरकारी नोकरीवालाच पाहिजे, अशा अपेक्षा नवरी मुलीच्या घरच्यांकडून ऐकावयास मिळत आहेत. शेतकरी, कामगार मुलगा तर त्यांना नकोच असल्याचे चित्र आहे.

शेवटी समाधान म्हणून मोठ्या शहरांमध्ये चांगल्या कंपनीत नोकरी असणाऱ्या मुलाला शेवटचा पर्याय म्हणून निवडले जात आहे. यामुळे मुलासाठी मुलगी शोधण्यासाठी मुलांच्या मंडळींना नाकीनऊ येत आहे. त्यातच मुलींच्या मंडळींची समाधानी म्हणा किंवा लग्न होईपर्यंतच का होईना म्हणून अनेकजण मोठ्या शहरांमध्ये जाऊन कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. 

‘लग्नाचा विषय सोड रं भाऊ’
मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. परिणामी, शहरातील कंपन्या सुरू ठेवण्यास बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणारे कामगार आपापल्या गावी परतले आहेत. काहीजण वाहतुक बंद असल्याने आहे तेथेच अडकून पडलेले आहेत.  त्यांना आता आपण मुलगी पाहण्यासाठी गेल्यावर सांगावे तरी काय? असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे या वर्षी तरी मी नवरदेव होणार ! असे म्हणणाऱ्यांची आशा मावळली असून त्यांच्यावर ‘लग्नाचा विषय सोड रं भाऊ’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.   

वधू पालकांनाही पडला पेच  
नेहमी मुलीसाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये नोकरीला असलेला मुलगा पाहिजे, असे म्हणणाऱ्यांनाही आता चांगलाच पेच पडला आहे. सरकारी नोकरीवाला मुलगा सर्वच मुलींना मिळणे शक्य नाही. त्यासाठी खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या मुलाचा पर्याय शेधणाऱ्या मुलीच्या मंडळीला आता हाही पर्याय अडचणीचा ठरणार की काय, असे वाटत आहे. कारण, सध्या गावाकडे आलेल्या या मुलांना पुन्हा कंपनीत काम मिळेल की नाही? हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Donation Scam : चंपत राय यांचा ड्रायव्हर 'टिन्नू' आणि सुभाष करायचे रोकड पार! राम मंदिर देणगी चोरीची 'मोडस ऑपेरंडी' उघड!

Central Railway: मध्य रेल्वेची महत्त्वाची घोषणा; मिरजमार्गे धावणाऱ्या चार गाड्या तात्पुरत्या रद्द; प्रवाशांची हाेणार गैरसोय

IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..

IND vs ENG 4th T20I : करावं तरी काय? भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव अन् इंग्लंडने जिंकली मालिका; गौतम गंभीर हतबल

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

SCROLL FOR NEXT