latur news 
मराठवाडा

कोरोना : पुण्यातून पळाले कुटुंब अन् लातूर पोलिसांची दमछाक

सकाळ वृत्तसेवा

लातूर : पुण्यात एका कोरोनाग्रस्त कुटुंबीयाच्या घरी कामाला असलेल्या काही व्यक्ती तेथून पळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी (ता. १२) पोलिस यंत्रणा कामाला लागली. तब्बल पाच तासांच्या शोधानंतर गुंफावाडी (ता. लातूर) येथे संबंधित व्यक्ती सापडल्या.

येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत रात्री साडेदहाच्या सुमारास सहा जणांना संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात येणार आहेत. 

दुबईहून पुण्यात एक कुटुंब आले असून ते कोरोनाग्रस्त आहे. त्यांच्याकडे कळंब येथील कुटुंब कामाला होते. मालक कोरोनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच हे कुटुंब तेथून पळाले. पुण्याच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात कळंबच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांना माहिती दिली. दिवसभर शोध घेऊनही कुटुंब सापडले नाही; पण ते लातूरला गेल्याची माहिती कळली.

गाठाळ यांनी पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना दिली. लातूरमध्ये शोध घेताना कुटुंब मुरूडला गेल्याचे सांगळेंना समजले. त्यांच्या पथकाने मुरूडचे पोलिस निरीक्षक गोमारे यांच्या मदतीने मुरूड परिसरात मोहीम सुरू केली. कुटुंब गुंफावाडीत गेल्याचे कळताच येथे पथक गेले. तेथील नातेवाइकाच्या घरी हे कुटुंब सापडले. 

सांगळेंसह त्यांच्या पथकाने मास्क घालूनच कुटुंबाची चौकशी केली. कोरोनाग्रस्त कुटुंबात हे कुटुंब राहिल्याने त्याच्याकडे संशयित म्हणून पाहिले जात आहे. तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेऊन तीन महिला, एक पुरुष व दोन मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

हलगर्जीपणाचा कळस

या प्रकरणात पुण्याच्या आरोग्य यंत्रणेने हलगर्जीपणा केल्याचे दिसत आहे. कोरोनाग्रस्त कुटुंबात काम करणाऱ्या व्यक्ती तेथून बाहेर कशा येऊ दिल्या, हा खरा प्रश्न आहे. या व्यक्ती आतापर्यंत कोणाच्या संपर्कात आल्या, त्या खासगी बसमधून किंवा अन्य कोणत्या वाहनातून आल्या, कोठे कोठे फिरल्या आदींची माहिती कोणत्याही यंत्रणेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT