Coronavirus: Jalna reports 17 new cases  
मराठवाडा

Coronavirus : जालना जिल्ह्यात नवे १७ रुग्ण, तिघे झाले बरे

सकाळ वृत्तसेवा

जालना  : जिल्ह्यात दिवसेंदिवस पसरलेला कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत आहे. सोमवारी (ता. २२) जालना शहरातील सात, अंबडमधील एक व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नऊ अशा १७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. कोविड हॉस्पिटलमधील तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जालना शहरात वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनत असल्यामुळे व्यापारी महासंघाने स्वयंस्फूर्तीने तीन दिवस जनता कर्फ्यू पाळला. या बंदमुळे कोरोना संसर्गाची साखळी तुटेल, अशी आशा होती. मात्र, हा कर्फ्यू संपताच सोमवारी शहरात विविध भागांत सात रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मंगळबाजार भागातील दोन, हकीम मोहल्ला येथील एक, नाथबाबा गल्लीतील एक, वाल्मीकीनगरमधील दोन व राज्य राखीव दलातील एका जवानाचा समावेश आहे. उर्वरित दहामध्ये तसेच अंबड शहरातील चांगलेनगरमधील एक व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नऊजणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

दरम्यान, कोविड हॉस्पि‍टलमध्ये उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले असून, त्यांच्या सलग दुसऱ्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. बरे झालेल्यांमध्ये उडपी हॉटेल परिसरातील एक, राज्य राखीव दलातील दोन जवानांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी सांगितले आहे. सोमवारी वाढलेल्या सतरा रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७८ झाली असून, त्यापैकी २४८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात ११९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात २९७ व्यक्तींचे संस्‍थात्मक अलगीकरण 
कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात २९७ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात ८४, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १०, संत रामदास वसतिगृहात ६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १६, मुलींच्या शासकीय निवासी वसतीगृहात ३१ तर बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ५६ व्यक्तीचे अलगीकरण करण्यात आले आहे. परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये ५ , अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ३ तर शासकीय मुलींच्या वसतीगृहात १२ व्यक्ती अलगीकरणात आहे.

बदनापूरमधील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १४, भोकरदन येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्रमांक दोनमध्ये १२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात तीन, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये नऊ व टेंभुर्णीतील ई. बी. के. विद्यालयात ३३ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 
  

कोरोना मीटर 

  • एकूण बाधित : ३७८ 
  • बरे झालेले :२४८ 
  • उपचार सुरू : ११९ 
  • मृत्यू : ११ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसच्या डाऊनफॉलचं विधान, परिपक्वतेवरून आजोबा पवारांनी पार्थचे टोचले कान; काँग्रेसनं म्हटलं, कृतघ्न मुलगा

Pune News: डॉ. मुग्धा कर्णिक यांचा पुण्यातील आळंदी संस्थानकडून निषेध; श्री विठ्ठल आणि संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य!

Washim News: पोहरादेवी यात्रा नंतर गायींना प्लास्टिकमुळे मृत्यू;स्थानिक गोपालकांचा नुकसानभरपाईसाठी ग्रामपंचायतकडे आग्रह

Hrishikesh Vaidya Case: भोंदूबाबा हृषीकेश वैद्यकडून तपासकामात असहकार्य; देवाचा अवतार असल्याची बतावणी, शेंडी न कापण्याचे आदेश!

Buldhana News: कोराडी धरणावरून आकाशात झेप घेणार सी-प्लेन; तांत्रिक सर्व्हेला झाली सुरूवात; विवेकानंद स्मारक आता येणार जगाच्या नकाशावर

SCROLL FOR NEXT