CoronaVirus News  
मराठवाडा

शुभमंगल सावधान म्हणताच नववधूवर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

लातूर : सोहळा आयोजित करून गर्दी जमवू नका, असा आदेश सरकारने दिलेला असतानाही त्याला केराची टोपली दाखवत चक्क महापालिकेच्या जागेवर विनापरवाना विवाह सोहळा आयोजित करून गर्दी जमविल्याप्रकरणी वधु-वर, दोघांचे आई-वडिल यांच्याबरोबरच भटजी आणि मंडपवाल्यावर पोलिसांनी शनिवारी (ता. २१) गुन्हा दाखल केला. त्यामुळे विवाह सोहळा आयोजित करणे चांगलेच महागात पडले आहे.

विवाह सोहळा हा आयुष्यात कायम लक्षात राहणारा क्षण. पण, याच दिवशी वधु-वराबरोबरच आठ जणांना पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ आली आहे. सिग्नल कॅम्प भागातील विवेकानंद रुग्णालयाच्या बाजूला पालिकेच्या जागेत विनापरवाना मांडव टाकून शिंदे-मगर परिवाराने आज दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांना विवाह सोहळा आयोजित केला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिस विवाहस्थळी पोहोचले. तोपर्यंत वधु-वरावर अक्षता पडल्या होत्या. लग्नसोहळ्यात १०० ते १५० जणांची गर्दी जमा झाली होती.

त्यामुळे पोलिसांनी सुरज खंडू शिंदे (वर) निकीत नरसिंग मगर (वधू), मुलाचे वडिल खंडू विठ्ठल शिंदे, आई शालू, वधूची आई उषा आणि वडिल नरसिंग हरी मगर यांच्याबरोबरच झुंजारे मंगलसेवा केंद्र आणि भटजीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी संजय शरद कुलकर्णी (वय ५४) यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिस निरिक्षक नानासाहेब लाकाळ, पोलीस उपनिरिक्षक राजेश घाडगे यांच्यासह बालाजी म्हस्के, गोविंद चामे, चंदर जाधव, रमेश कांबळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Yuzvendra Chahal Retirement : युझवेंद्र चहलने अचानक घेतली निवृत्ती; पोस्टने खळबळ, म्हणाला, माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक, पण...

Mumbai News: शौचालयातील विषारी वायूमुळे 2 तरुणांचा मृत्यू; गोरेगावातील 'त्या' कारखान्याला टाळे ठोकण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : कॅप्टन स्मित मच्छार यांचा 'अशोक चक्रा'साठी विचार करावा, मिलिंद देवरा यांची पंतप्रधान मोदींना विनंती

Captain Smit Machhar: ‘कॅप्टन स्मित, धन्यवाद!’; इस्रायलकडून मुंबईत होर्डिंग्जद्वारे भारतीय वैमानिकाला सलाम

SCROLL FOR NEXT