file photo 
मराठवाडा

कापूस घरातच पिवळा पडण्याचा धोका

कैलास चव्हाण

परभणी : लॉकडाउनमुळे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबल्याने अखेरच्या टप्प्यातील तूर, कापूस खरेदीला फटका बसला आहे. अन्य जिल्ह्यात खरेदी सुरू असताना परभणी जिल्ह्यात मात्र खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांना कापूस जपण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांना ठेवायाला जागा नसल्याने घरात अडचणीत धोका पत्करून कापूस ठेवण्याची वेळ आली आहे.

परभणी जिल्ह्यात १९ लाख ६१ हजार १४०.०५ क्विंटल अशी कापूस खरेदी झाली आहे. त्यामध्ये राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाकडून १३ केंद्रांवर आतापर्यंत पाच लाख ३५ हजार ३५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. भारतीय कापूस निगम महामंडळ अर्थात सीसीआयच्या परभणी जिल्ह्यातील सात केंद्रांतर्गत आठ लाख ८८ हजार ४९२ क्विंटल, परभणी जिल्ह्यातील खासगी व्यापाऱ्यांनी पाच लाख ९३ हजार ९८३ क्विंटल कापूस खरेदी केली आहे. त्यानंतर आलेला पाऊस आणि कोरोनाचे संकट यामुळे खरेदी बंद करण्यात आली आहे. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याची माहिती आहे. तसेच तुरीचीदेखील खरेदी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे तूरही शिल्लक आहे.

गोदामाची व्यवस्था नसल्याने घरातच साठवणूक

अनेक शेतकऱ्यांची लहान घरे आहेत. गोदामाची व्यवस्था नसल्याने घरातच त्यांनी शेतमालाची साठवणूक केलेली आहे. सध्या लॉकडाउनमुळे शेती किंवा घरीच बसावे लागत आहे. त्यात घरात असलेल्या शेतमाल हा अडचणीला ठरू लागला आहे. अल्पभूधाकर शेतकऱ्यांना अधिक दिवस शेतमाल घरात ठेवणे शक्य नसते. त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर शेतमाल विक्री करावा लागतो. सुरवातीला भाव नसल्याने शेतमाल विक्री केला नाही, पुढे खरेदी केंद्रावर लागलेल्या रांगा पाहता अनेक शेतकऱ्यांनी गर्दी कमी होण्याची वाट पाहिली. परंतु, लॉकडाउनमुळे आता कापूस, तूर जपण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - मदत कार्यात बचत गटही सरसावले !

कापूस घरात ठेवणे धोक्याचे
कापूस हा ज्वलनशील असल्याने आणि सध्या उन्हाचा कडाका तापू लागल्याने राहत्या घरात कापूस ठेवणे धोक्याचे आहे. तसेच जास्त दिवस कापूस घरात ठेवल्यास पिवळा पडतो. त्यामुळे विक्री करताना अडचण होणार आहे. त्यामुळे किमान कापूस खरेदी केंद्र तरी सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Water Crisis : राज्यावर महादुष्काळाचे संकट! फक्त ८५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; शेतीसाठी पाणीपुरवठा बंद, अनेक शहरांत पाणीकपात

Nitesh Rane Attacks Abhijit Dipke : 'कॉकरोच पार्टी'चा कोणताच प्रभाव नाही, नितेश राणेंनी अभिजीत दिपकेंना फटकारलं

Dhule: गोव्यात साधू बनून लुबाडणारे तिघे अटकेत; धुळे तालुका पोलिसांची बायपासवर कारवाई; संशयित गुजरातचे

Jalgaon: सहायक अधिकारी, दोन लेखापरीक्षक तीस हजारांची लाच घेताना जाळ्यात; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

E20 ते E100 इंधनावर धावणारी वॅगनआर बायोफ्लेक्स, किंमत किती?

SCROLL FOR NEXT