File photo 
मराठवाडा

तुम्ही वाचाच : ‘हा’ अभ्यासक्रम देतो शंभर टक्के नोकरी

श्याम जाधव

नवीन नांदेड : `बि.एच.एम.सी.टी’ या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मान्यता प्राप्त चार वर्षाचा अभ्यासक्रमानंतर १०० टक्के नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. किमान ३० हजारापेक्षा अधिक मासिक पगाराची शाश्वती देणारा हा अभ्यासक्रम असून, इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तुलनेने सोपा देखील आहे. कारण या अभ्यासक्रमात थेअरीपेक्षा प्रात्यक्षिकांवर अधिक भर असतो.

असे आहे अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य
हॉटेल व्यवस्थापनात कूक, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी हॉटेल मॅनेजर, हाऊसकिपींग मॅनेजर, रेस्टोरंट व किचेन सुपरवायझर, फ्रंट ऑफिस, एअरलाईन्स, फूड सर्विस प्रोवाइडर, कार्पोरेट कँटीन मॅनेजर, मॉल्स, रेल्वे, शिपिंग मध्ये किचन कॅन्सल्टंट, फास्टफूड क्षेत्रात नोकरीची अनेक दालने केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही उपलब्ध आहेत. तसेच अनेक शासन अंगीकृत संस्था महाराष्ट्र टुरिझम डिव्हलोपमेंट कार्पोरेशन व इंडियन टुरिझम डिव्होलपमेंट कार्पोरेशन, रेल्वे, शिपिंग या आस्थापनातही मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारांना परदेशातही मागणी आहे.

मराठवाड्यात ‘ए.आय.सी.टी.इ.’ मान्यताप्राप्त ‘बि.एच.एम.सी.टी.’ हा अभ्यासक्रम केवळ ग्रामीण तंत्रनिकेतन, विष्णुपुरी नांदेड या संस्थेत राबवला जातो. गंमत म्हणजे या अभ्यासक्रमास कला, विज्ञान वाणिज्य, एम सी व्ही सी अशा कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतो. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी MAH-BHMCT-CET २०२० हि प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते.  शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक १० मे २०२० रोजी होणार असून त्याकरिता २८ मार्च पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अशी होते प्रवेशप्रक्रिया
‘बि.एच.एम.सी.टी.’ प्रवेशासाठी १०० गुणांची कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते. ती इंग्रजी माध्यमातून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नावर आधारित असते. प्रत्येक प्रश्नास एक गुण असतो तर चुकीच्या उत्तरास नकारात्मक पद्धतीने गुण कमी केले जातात. इंग्रजी व्याकरण व विषयावर आधारित ४० गुण, सामान्य ज्ञानास अनुसरून ३० गुण, तर बुद्धिमत्तेवर आधारित ३० गुण असे १०० गुणांचे वर्गीकरण या परीक्षेत असते. संबंधित प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलच्या संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.

पूर्व परिक्षेविषयी प्रशिक्षणाची संधी
या अभ्यासक्रमाच्या पूर्व परीक्षेचे अर्ज भरणेसाठी, परीक्षा पद्धती समजावून सांगण्यासाठी पूर्व परीक्षेविषयी १५ दिवसांचे प्रशिक्षण संस्थेतर्फे देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले उज्वल भवितव्य घडवावे व अधिक माहितीसाठी विभागप्रमुख  गायत्री पाटील यांचेशी संपर्क साधावा.
- प्राचार्य, डॉ. विजय पवार (ग्रामीण तंत्रनिकेतन, विष्णुपुरी, नांदेड)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT