covid 19 covid 19
मराठवाडा

कोरोना चाचणीसाठी ग्रामीण भागातील टाळाटाळ ठरतेय धोकादायक

कोरोनाबाबतच्या पसरलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज नागरिकांना कोरोनाच्या खाईत ढकलण्यास कारणीभूत ठरत आहेत

सकाळ वृत्तसेवा

बीड: एकीकडे दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणू (corona virus) जीवघेणा ठरत असताना ग्रामीण भागात कोरोनाबाबतच्या पसरलेल्या अंधश्रद्धा, गैरसमज नागरिकांना कोरोनाच्या खाईत ढकलण्यास कारणीभूत ठरत आहेत. तीव्र स्वरूपाची लक्षणे असूनही अनेकजण कोरोना चाचणीसाठी टाळाटाळ करत असून, गाव-खेड्यातील डॉक्टरांकडून औषध घेऊन आजार अंगावर काढत असल्याचे भयावह चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

कोरोना म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील फार मोठे षडयंत्र आहे. साधी सर्दी जरी असेल, तरी कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो. मग सरकारी दवाखान्यात भरती करून घेतले जाते. तेथे हाल केले जातात. असे अनेक तर्क-वितर्क ग्रामीण भागात लढविले जात आहेत. कोरोना - बिरोना सब झूट है.. अशा फुशारक्या मारत कोरोनाच्या त्रिसूत्रीला खुंटीवर टांगून गावभर हुंदडणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अनेकदा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही संबंधित रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यास थेट नकार देत असल्याने आरोग्य प्रशासनही हतबल झाले आहे. अशा मानसिकतेतूनच कोरोना मृत्यूदर वाढत आहे.

जोवर रुग्णाची प्रकृती खालावत नाही, तोपर्यंत रुग्णही त्याच डॉक्टरकडून उपचार घेतो. एवढे करूनही प्रकृतीत फरक पडला नाही, तर मग शासकीय रुग्णालयाची वाट धरली जाते. रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत आल्यानंतर डॉक्टरही हतबल होतात. अतिशय गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णांचे प्राण वाचविणे डॉक्टरांनाही कठीण जाते. त्यामुळे थोडी जरी लक्षणे आढळली, तरी संबंधित रुग्णाने तातडीने कोरोना चाचणी करून घेऊन पॉझिटिव्ह आल्यास उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

सध्या कोरोनाने थैमान घातल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शासकीय यंत्रणा कडक उपाययोजना करत कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. अशात टाकरवण येथे ताप, सर्दी, अंगदुखी यासारख्या आजारांनी डोके वर काढले काढल्याने नागरिक चिंतेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'शेतापर्यंत आता हक्काचा रस्ता; गावनिहाय शिवारफेरी, रस्त्याला संकेतांक मिळणार; वादावादी मिटणार

CET 2025 : आता केंद्रांपर्यंत जाणे हीच ‘परीक्षा’, सारथी, बार्टी, महाज्योतीचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांना फटका

Nagpur Crime: अकरा वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या; खापरखेडा जवळील चनकापूर हादरले, तिघांना अटक

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

SCROLL FOR NEXT