corona corona
मराठवाडा

Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत २९५ जणांना बाधा

हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही एकच रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात मंगळवारी (ता. सहा) २९५ नवे कोरोनाबाधित आढळले तर पाच जणांचा मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यातील १३२ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ७५ रुग्णांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही केवळ एकच रुग्ण आढळला.
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ४३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यापैकी शहरातील ११ रुग्ण आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात नऊ अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. सध्या ६७ रुग्ण उपचार घेत असून, एक बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे.

दिवसभरात लातूर जिल्ह्यात कोरोनाचा उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या दोन हजार ४०५ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचे नवे १४ रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात दहा नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात एकही मृत्यू झाला नसून ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. बीड जिल्ह्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला तर १३२ रुग्ण आढळले.

जालना जिल्ह्यात जिल्ह्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. नव्याने ११ रुग्ण आढळून आले असून, २० रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात ७५ नवीन रुग्णांची भर पडली. दिवसभरात कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण आढळून आला तर एक रुग्ण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली. या जिल्ह्यातही मृत्यूची नोंद नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Pune University Fake Degree: पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी प्रकरणात कर्मचारी रमेश मुखेकर ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत

Pune Voter List Revision: पुण्यात मतदार यादी पुनरीक्षणाचे फक्त ५५ टक्के काम; आठ दिवसांत उर्वरित ४५ टक्के पूर्ण करण्याचे प्रशासनास आव्हान

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

SCROLL FOR NEXT