covid 19 covid 19
मराठवाडा

Corona Updates: मराठवाड्यात २४ तासांत ३६५ जणांना कोरोनाची बाधा

औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने ७७ रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ६०७ झाली असून बरे झालेल्या आणखी १२१ जणांना सुटी देण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात मंगळवारी (ता. २२) दिवसभरात ३६५ कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय रुग्णसंख्येत बीड १४७, औरंगाबाद ७७, उस्मानाबाद ५०, लातूर ३३, परभणी २४, नांदेड १५, जालना १४, हिंगोली ५ जणांचा समावेश आहे. आणखी सोळा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात औरंगाबादेत आठ, जालना-लातूर-नांदेड-बीडमधील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने ७७ रुग्ण आढळले. रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ६०७ झाली असून बरे झालेल्या आणखी १२१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत १ लाख ४१ हजार २६७ रुग्ण बरे झाले आहेत. ९४१ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी आठ जणांचा मृत्यू झाला. त्यात घाटी रुग्णालयात पाच, जिल्हा रुग्णालयात एक तर खासगी रुग्णालयातील दोघांचा समावेश आहे. आतापर्यंत ३ हजार ३९९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जालन्यात दोघांचा मृत्यू-
जालना जिल्ह्यात कोरोनाने आणखी दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एक हजार १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या १४ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ६१ हजार ४९ वर पोचली असून आणखी २० रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ५९ हजार ६३१ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २७९ जणांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभारली प्रयोगशाळा

SCROLL FOR NEXT