3Corona_102 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात २८ कोरोना रुग्णांची वाढ, दोन-तीन दिवसांमध्ये मृत्यूची नोंद नाही

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रविवारी (ता.आठ) २८ कोरोना रुग्णांची वाढ झाली. गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यु झालेला नाही. शिवाय बरे होणाऱ्यांची संख्या देखील दाखल रुग्णांपेक्षा अधिक असल्याने काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळाला आहे. दिवसभरात ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.९९ टक्के इतके असुन आतापर्यंत १४ हजार १८० इतके रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे दिसून येत आहे. मृत्यूदर ३.६३ टक्के इतका असला तरी जिल्ह्यामध्ये होत असलेल्या मृत्युची संख्या अत्यंत कमी असुन गेल्या काही दिवसांमध्ये तर मृत्युचा आकडाच थांबलेला आहे.

मात्र इतर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये मृत्यु झालेल्या रुग्णाची नोंद जिल्ह्याच्या पोर्टलवर होत आहेत. साहजिकच दररोज किमान दोन ते तीन एवढे मृत्युची नोंद पोर्टलवर होत आहे. त्यामुळे मृत्युचा दर आहे. तसाच राहिल्याचे दिसुन येत आहे. त्याचबरोबर स्वॅब तपासणीचा आकडाही वरचेवर कमी होत असल्याचे चित्र आहे. मागच्या काही दिवसांचा विचार करता पाचशे ते साडेपाचशेवरुन अँटिजेन टेस्टची संख्या आता साडेतीनशेच्या आतमध्येच टेस्ट होत आहेत. त्यामुळे लक्षणे असणाऱ्या लोकांचीही संख्या आता कमी होत आहे.

जिल्ह्यामध्ये दिवसभरामध्ये २८ रुग्ण सापडले असून तालुकानिहाय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. उस्मानाबाद १३, कळंब आठ, वाशी तीन, भूम दोन, लोहारा एक, तुळजापुर एक, उमरगा व परंडा येथे एकही रुग्ण सापडलेला नाही. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील अँटिजेन टेस्ट तसेच जिल्ह्याबाहेरील काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची पोर्टलव नोंद आहेत. त्यामुळे त्याची नोंद दररोजच्या क्रियाशील रुग्णामध्ये येत असल्याने दररोजच्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णसंख्यात प्रत्यक्ष त्यादिवशी आलेल्या रुग्णसंख्या पेक्षा जास्त दिसू लागली आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १५०८७
बरे झालेले रुग्ण - १४१८०
उपचाराखाली रुग्ण- ३६०
एकुण मृत्यु - ५४७
आजचे बाधित - २८
आजचे मृत्यु - ००
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT