संग्रहित चित्र. 
मराठवाडा

जालना जिल्हा रुग्णालयावरील कोरोनाचा भार होणार कमी 

महेश गायकवाड

जालना - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले सर्व कोविड केअर सेंटर दोन दिवसांत सुसज्ज करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावरील कोरोना संशयित रुग्णांचा वाढलेला भार लवकरच कमी होणार आहे. 

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २० ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरच्या तयारीबाबत अपर जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत (आर.बी.एस.के) कार्यरत आयुष डॉक्टरांकडून गुरुवारी (ता.सात) आढावा घेतला. बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय जगताप, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. संतोष कडले यांच्यासह सर्व संबंधित डॉक्टर्स उपस्थित होते. 

कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या रुग्णांना या सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या व घशाचे स्राव घेऊन तपासणीसाठी पाठविण्याची व्यवस्था कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ६४ आयुष डॉक्टरांची निवड करण्यात आली असून, या सेंटरची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांवर देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. 

सेंटरमध्ये १७३९ खाटांची व्यवस्‍था 

जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी कोरोना संशयितांचे स्‍क्रीनिंग होणार आहे. लक्षणे आढळून आल्यास रुग्णांस कोविड केअर सेंटरमध्ये भरती करून याच ठिकाणी त्याचे नमुने घेण्यात येऊन प्रयोगशाळेत पाठविण्याची व्यवस्‍था करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये एक हजार ७३९ खाटांची व्यवस्‍था असणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT