3corona_1180 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात १६३ जणांना कोरोना, सहा जणांचा मृत्यू

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये सोमवारी (ता.१४) १६३ जणांना कोरोनाची लागण झाली असुन सहा जणांचा मृत्यु झाला आहे. दिवसभरामध्ये साडेपाचशे रुग्णांवर उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ७५.३५ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, तर मृत्युचा दर २.९० टक्के एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये सात हजार ८८१ एवढ्या व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असुन ९१७ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईमध्ये आहेत.


मृत्यु होणाऱ्यामध्ये चार जण उस्मानाबाद तालुक्यातील असून भुम व परंडा तालुक्यातील प्रत्येक एक जणाचा मृत्यु झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील ६० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये तर पळसप गावातील ७९ वर्षीय पुरुषाचा लातुर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कामेगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाचा तसेच तेर येथील ६० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.

भुम तालुक्यातील पाटसांगवी येथील ५० वर्षीय स्त्रीचा बार्शी येथील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यु झाला. परंडा येथील खंडारी गावच्या ५२ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. जिल्ह्यामध्ये १६३ रुग्णापैकी ७५ जण आरटीपीसीआरद्वारे तर ७६ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर बारा जण परजिल्ह्यात बाधित झाले आहेत. उस्मानाबादमध्ये ५४ जण बाधित झाले असुन यामध्ये ३२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर १६ जण आरटीपीसीआरमधून बाधित झाल्याचे समोर आले आहे.

सहा जण परजिल्ह्यात बाधित झाले आहेत. तुळजापुर येथील २५ जण पॉझिटिव्ह आले असुन आरटीपीसीआरद्वारे १२ तर १३ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उमरगा येथील २४ जण बाधित झाले आहेत. त्यातील १९ जण आरटीपीसीआरद्वारे तर चार जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कळंब तालुक्यातील १८ जण बाधित झाले असुन त्यामध्ये नऊ जण आरटीपीसीआरद्वारे नऊ जण व आठ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंडा नऊ जण बाधित आढळले असुन लोहारा दहा, भुम दहा व वाशी तेरा जणांना कोरोनाची लागन झाली आहे. जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढुन आठ हजार ६९७ त्यातील सहा हजार ५५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या एक हजार ८९२ रुग्णावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २५२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील अधिकारी EDच्या रडारवर, सायबर फसवणुकीतील खात्यांबाबत मोठा खुलासा; मुंबईतील वकिलाला अटक

IND A vs NZ A Live : भारतासोबत चिटींग? न्यूझीलंडच्या फलंदाजांचा मैदानावर येण्यास नकार; सामना ड्रॉ करावा लागला; नेमकं काय घडलं?

SIR Voter Name Deletion Controversy : लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न? निवडणूक अधिकाऱ्यांनीच भरले 61,000 पेक्षा जास्त अर्ज; नावे वगळण्यासाठी संशयास्पद हालचाली

Instagram New Feature: इंस्टाग्रामवर आता ९० मिनिटांचे व्हिडीओ पाहता येणार? नवीन फीचरची चाचणी सुरू

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघात विजय आमचाच होणार; भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा दावा

SCROLL FOR NEXT