3corona_1180 
मराठवाडा

Corona Update : उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ सात नवीन रुग्ण

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) केवळ सात कोरोना रुग्णांची भर पडली. दुसऱ्या टप्प्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाच्या भीतीने अनेकांना हैराण केले होते. थंडीचे दिवस असल्याने दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढेल अशी भीती अनेकांना होती. मात्र, आता कोरोना संसर्गाची वाढ आटोक्यात असल्याचे चित्र सध्या आहे. गुरुवारी  जिल्ह्यात ८४ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

यातील केवळ तीनजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर २२३ जणांची अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. यामध्येही केवळ चारच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित २१९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. म्हणजेच जिल्ह्यात गुरुवारी एकूण सातच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. दोन दिवसांपासून कोरोनाने एकही रुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे सध्यातरी कोरोनाचा धोका कमी झाला असल्याचे चित्र दिसत आहे.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांचा डंका ! तीन दिवसात तिन्ही सिनेमांनी केलेलं कलेक्शन घ्या जाणून

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT