file photo
file photo 
मराठवाडा

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर (जि.परभणी) : इटोली (ता. जिंतूर) शिवारात सोमवारी (ता. १६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका अर्ध वयस्कर बिबट्याने गायीवर हल्ला करून तिला ठार मारले. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांत दहशीतीचे वातावरण पसरले आहे.

इटोली परिसरात घनदाट जंगल आहे. या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असून अधूनमधून या भागामध्ये बिबट्या पाहण्यास मिळतो. सोमवार दुपारी तीनच्या सुमारास नागोराव रामजी आडे यांच्या शेतात बांधून ठेवलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्यूमुखी पडली आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे बघितल्यानंतर वनखात्याला पाचारण करण्यात आले. जिल्हा वन अधिकारी विजय सातपुते यांनी घटनास्थळाला भेट दिली. या वेळी त्यांनी परिसराची पाहणी केली.

कमी वयाचा बिबट्या
दरम्यान, इटोली परिसरामध्ये मागील अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या शिवारात वारंवार दिसून येतो. याच्यासोबत मादी असून या बिबट्याचे वय कमी आहे. बिबट्याने नदीकाठी पाणी पिल्यानंतर त्यास गाय दिसल्याने त्याने हल्ला केला असावा. या बिबट्यास लवकरच पावबंद करू तेव्हा नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन अधिकारी विजय सातपुते यांनी केले.

हेही वाचा ...

कॅनॉलच्या चारीत पडून तरुणाचा मृत्यू
वालूर (जि.परभणी) : डुघरा (ता. सेलू) शिवारातील कॅनॉलच्या चारीच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) सायंकाळी झाली.

हेही वाचा- ‘बुलेट’वरून नर्मदा परिक्रमा !
डुघरा गावातील रहिवासी विजय साहेबराव झाकणे (वय ३५) हा शुक्रवारी (ता. १३) पाहुण्याकडे भेटायला दुचाकीवरून ( एमएच २२ - एएस ६१२४) गेले होते. निम्न दुधना प्रकल्पाच्या डुघरा शिवारातील डाव्या कालव्याजवळ दुचाकी धडकल्याने चारीच्या खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेस दोन ते तीन दिवस झाले असल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेता येत नसल्याने जागेवरच वालूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रकाश वाठोरे यांनी उत्तरीय तपासणी केली. मृताचा भाऊ सुरेश साहेबराव झाकणे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा ....

शेतकऱ्याचा घराच्या
छतावरून पडून मृत्यू

पूर्णा (जि.परभणी) : येथील जुना मोंढा परिसरातील शेतकरी माधव प्रल्हादराव वळसे (वय ५२) यांचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १६) घडली.


देगाव (ता. पूर्णा ) हे सायंकाळी शेतातील कामे आटोपून ते पूर्णेत घरी आले. सध्या उकाडा वाढल्याने ते आपल्या घराच्या छतावर रात्री झोपण्यासाठी गेले. रविवार (ता. १५) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ते झोपीतच छतावरून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना नांदेड येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार दरम्यान, सोमवारी (ता. १६) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या देगाव या गावी सोमवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT