lach sakal
मराठवाडा

आष्टी : ३० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा

आष्टी तालुक्यातील गहुखेल-वेलतुरी ग्रामपंचायतीतील प्रकरण

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी : ग्रामपंचायत इमारत दुरुस्ती कामाचे बिल काढण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच (Bribe)मागितल्याप्रकरणी तालुक्यातील गहूखेल-वेलतुरी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक सय्यद शकील सय्यद (वय 46, रा. धामणगाव ता. आष्टी) याच्याविरुद्ध (ता. सात) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात (POLICE STATION ASHTI)सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, सय्यद शकील सय्यद हा तालुक्यातील गहुखेल-वेलतुरी ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. या ग्रामपंचायत इमारतीच्या दुरुस्तीचे काम झाले होते. त्याचे बिल काढण्यासाठी तसेच जीएसटीचे 42 हजार 742 रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा न करता तक्रारदारांना देण्यासाठी सय्यद याने 50 टक्के लाचेची मागणी केली होती.

यासंदर्भात तक्रारदाराने ता. 23 डिसेंबर रोजी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता सय्यद शकील सय्यद याने 30 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सय्यदविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात आज (ता. सात) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक भारत राऊत, पोलिस अंमलदार सुरेश सांगळे, हनुमान गिराम, वाहनचालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : आष्टीत पुरामुळे इमारतीवर अडकलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT