संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीडमध्ये भाजपच्या सरचिटणीसाला चोपले, राष्ट्रवादीच्या सहा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पाटोदा (जि. बीड) - तालुक्‍यातील भाजपचे सरचिटणीस तथा रोहतवाडीचे सरपंच पांडुरंग दादाराव नागरगोजे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. 19) घडली. याप्रकरणी बुधवारी याबाबत राष्ट्रवादीच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याविषयी पांडुरंग नागरगोजे यांनी बुधवारी पाटोदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात 
म्हटले आहे की, ते रविवारी (ता. 19) शहरातील पारगाव चौकात उभे असताना अंगद खडू काळुशे (रा. महासांगवी) याने त्यांना फोन करून शहरातील एका पेट्रोलपंपावर बोलावून घेतले. त्या ठिकाणी अंगद याच्यासह इतर पाचजणांनी प्लॅस्टिकची खुर्ची डोक्‍यात मारून दुखापत केली.

सर्वांनी मिळून शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. सरपंच नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलिस ठाण्यात अंगद खंडू काळुशे, महादेव भीमराव खाडे (रा. करंजवन), अजित आश्रुबा वणवे (रा. रोहतवाडी), अजित हनुमंत पवार (रा. कुसळंब), राम शशिकांत हरी (रा. क्रांतीनगर, पाटोदा), पवन अनिल जायभाय (रा. क्रांतीनगर पाटोदा) यांच्याविरोधात पाटोदा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अमेरिकेच्या एका निर्णयाने सोनं स्वस्त! महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती? सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार?

Anant Nag: दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना फाळके सन्मान, पंतप्रधानांनी ट्वीट करुन दिल्या शुभेच्छा

Kolhapur Crime: डॉ. सोनल वालावलकरला गर्भलिंग निदानप्रकरणी मोका, हॉस्पिटलवर छापा; डॉक्टर पसार

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

SCROLL FOR NEXT