crime filed against 150 people for stone pelting in Hingoli
crime filed against 150 people for stone pelting in Hingoli  
मराठवाडा

हिंगोलीतील दगडफेक प्रकरणात दीडशे जणांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली शहरातील दगड प्रकरणांमध्ये शहर पोलिसांनी दीडशे जणांवर सोमवारी (ता. 12) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून पंधरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

हिंगोली शहरातील औंढा रोड भागात कावड यात्रेवर दगडफेक झाल्याची घटना सोमवार (ता. 12) सकाळी घडली यावेळी जमावाने वाहनांवर दगडफेक केली. या दगडफेकीत मध्ये दुचाकी वाहन ऑटो तसेच तीन बसेस व टेम्पोचे नुकसान झाले आहे. जमावाने नांदेड नाका, बस स्थानक परिसर, मस्तानशाहा नगर, देवडा नगर, बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्ष या ठिकाणी जाऊन तोडफोड केली. यामुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. आहे यावेळी जमावाच्या दगडफेकीत मध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले.

दरम्यान दगडफेकीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व पोलिसांनी केलेल्या छायाचित्रीकरणाची तपासणी करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या तक्रारीवरून शेख उमर शेख दाऊद, शेख शाहरुख शेख पप्पू, शेख इरफान, शेख अहमद, शेख तोफिक, शेख शाहरुख उर्फ दुंडा यांच्यासह दीडशे जणांवर दगडफेक करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, तसेच सरकारी कामात अडथळा आणणे यासह इतर आरोपावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड, उपनिरीक्षक सूर्यकांत घेवारे, किशोर पोटे, यांच्या पथकाने धरपकड मोहीम सुरू केली आहे या मोहिमेमध्ये रात्री उशिरा पंधरा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान शहरात शांतता असून पोलिस बंदोबस्त कायम आहे. संवेदनशिल भागात पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणात निरपराध असलेल्या व्यक्तींवर कारवाई होणार नाही. मात्र दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT