crime
crime 
मराठवाडा

डमी परिक्षार्थीचा गुन्हा चार वर्षांनी दाखल 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : डमी परिक्षार्थी प्रकरणाने मागील चार वर्षापासून महाराष्ट्र ढवळून निघत आहे. याच प्रकरणात पुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन आरोपीविरूध्द मंगळवारी (ता. 23) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अनेकजण अजूनही नांदेडच्या कारागृहात बंदीस्त आहेत. 

डमी परिक्षार्थी बसवून राज्यातील एमपीएससी, सरळसेवा भरती आणि विविध स्पर्धा परिक्षेत यश मिळविणाऱ्या टोळीचा पर्दाफास मांडवी येथील योगेश जाधव यांनी केला होता. या प्रकरणात मांडवी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी झाली की, विविध विभागात अशा रॅकेटकडून शासकिय नोकरी मिळवून पंख्याची हवा खाणाऱ्यांना अटक केली. अटक केलेल्यापैकी अनेकजण अजूनही कारागृहातच आहेत. हे प्रकरण कालांतराने राज्य गुन्हे अन्वेशन विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आले. सीआयडीने यात मुळापर्यंत जाऊन अनेकांना अटक केली. जवळपास ३६ जणांना अटक करून कारागृहात पाठविले. औरंगाबाद सीआयडीने औद्योगीक प्रशिक्षण विभागाच्या संचालकांना पत्र व्यवहार केला. 

यावरून या विभागाने गंभीर दखल घेत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात ता. २२ जानेवारी २०१५ रोजी कनिष्ठ लिपीक पदाची लेखी परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत निखील हिरासिंग चव्हाण या मुळ उमेदवाराने स्वत: परिक्षा न देता प्रबोध राठोड याच्या मदतीने डमी परिक्षार्थी म्हणून परभणी कृषी विद्यापीठातील अरविंद टाकळकर याला परिक्षेला बसविले. यात तो पास झाला. परंतु नोकरी निखील चव्हाण या उमेदवाराला लागली. यातून हे रॅकेट लाखोंचा कारभार करत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात वरिष्ठांच्या आदेशावरून औद्याेगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोविंदसिंग गणपतसिंग पाटनुरकर यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये आरोपी निखील चव्हाण, प्रबोध राठोड आणि अरविंद टाकळकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गोपीनाथ वाघमारे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT