crime news in dhule sakal
मराठवाडा

मुलींची छेड काढण्याचा जाब विचारल्याने बाप-लेकावर जमावाचा हल्ला, धुळ्यातील घटना

सागर आणि मगन यांनी असरारला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

सकाळ डिजिटल टीम

सागर आणि मगन यांनी असरारला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

धुळे जिल्ह्यातील साक्रीतील निजामपूर गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या बाप लेकावर जमावाने हल्ला करुन त्यांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक नंदुरबारच्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

घडलेली घटना अशी की, निजामपूर येथे राहणाऱ्या दोन मुली किराणा दुकानाकडे जात असताना गावातील सागर आणि मगन या दोन मुलांनी त्यांचे हात पकडून त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी असरार मुनाफ मणियार यांनी या दोघा मुलांना छेड काढू नका, असे सांगून तिथून हटकून लावण्याचा प्रयत्न केला असता सागर आणि मगन यांनी असरारला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सागर याच्या हातात असलेल्या फळीला खिळे ठोकलेले असल्याने असरार मणियार याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.

काही काळात असरारचे वडील मुनाफ गफ्फार मणियार हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना घटनास्थळावर असणाऱ्या अनिल, सतीश, शुभम, गोल्या आणि राकेश यांनी मारहाण करण्यास मदत केली. सागर खैरनार याने हातातील फळीने मुनाफ यांना डोक्याच्या मागील बाजूस गंभीर वार केला. त्यामुळे मुनाफ जमिनीवर कोसळले तसेच असरारही गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला होता. त्याच्या नाकातून रक्त निघत असल्याने त्याला जैताणे येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.

मुनाफ मणियार यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह निजामपूर पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. आरोपींना अटक केल्याशिवाय पुढील कार्यवाही करणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस पथकाने तातडीने हालचाली करत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींचे अटक सत्र सुरु झाल्यामुळे नातेवाईकांचा रोष कमी झाला. यादरम्यान रात्री सात जणांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांन्वये निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह नेणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतल्या. त्यामुळे पोलीस पथकाने पहाटेपर्यंत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान गावात शांततेचे वातावरण असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT