crime news esakal
मराठवाडा

Chh. Sambhajinagar : मला गणेशभाऊ का म्हटला नाही म्हणत, दोन ‘आमदारां’ची लॉज व्यवस्थापकाला मारहाण

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : सात जणांचे टोळके एका लॉजवर गेल्यानंतर त्यांनी लॉज व्यवस्थापकाला मला गणेशभाऊ का म्हटला नाही असे म्हणत बेदम मारहाण केली. ही घटना ३० जून रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजेदरम्यान केंब्रिज चौक परिसरातील हॉटेल विजयराज लॉजिंगमध्ये घडली.

याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघा आमदारांसह इतर नऊजणांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात १ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रवि नारायण दळवी (३१, रा. ता. सिल्लोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते सदर परिसरात लॉज चालवितात. ३० जूनच्या रात्री दोघांची आमदार ही टोपण नावे असलेले आणि तर त्यांचे सातजण साथीदार हे दळवी यांच्या लॉजवर आले. तिथे लॉजचे व्यवस्थापक मंगेश शेलार यांना आरोपींनी गणेशबाबत विचारणा केली असता, मंगेश याने कोण गणेश पाहिजे असे उद्धटपणे म्हटला, राग आल्याने त्यावर आरोपीने गणेशभाऊ का म्हटला नाही असे म्हणत शेलार याला मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यावेळी सर्व साथीदारांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी बेदम मारहाण करत यानंतर तुम्ही लॉजिंग कशी चालवितो असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान लॉजच्या सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता, तसेच चौकशीअंती दोघांना आमदार या टोपण नावाने ओळखत असल्याचे समोर आले. याप्रकरणी एमआयीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहायक फौजदार सोनार हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल दोषी, मुंबई हायकोर्टाने दिला निकाल

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT